अभिनेत्री शिवानी सुर्वे ही स्टार प्रवाह वरील “देवयानी” या मालिकेमुळे घराघरात पोहोचली आणि अजुनही ती प्रेक्षकांच्या मनात आहे. शिवानी आपल्याला बिग बॉस सीजन 2 मध्ये देखील पाहायला मिळाली.
“ट्रिपल सीट” या मराठी चित्रपटात देखील तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. तिने देवयानी. सुंदर माझे घर. तू जीवाला गुंतवावे. यांसारख्या मराठी मालिकेमध्येदेखील काम केली आहेत.
तसेच तिने 2016 मध्ये हिंदी मालिका “जाना ना दिल से दूर” यामध्ये देखील शिवानीने मुख्य भूमिका साकारली होती. 2018 मध्ये “एक दीवाना था” त्याचप्रमाणे अँड टीव्ही वरील “लाल इश्क” यामध्ये देखील शिवानी दिसून आली.
कलर्स मराठी वरील बिग बॉस सीजन 2 मध्ये अभिनेत्री शिवानी सुर्वेने तिच्या आणि अभिनेता अजिंक्य ननावरेच्या नात्याबद्दल सांगितले होते. स्टार प्रवाह वरील “तू जीवाला गुंतवावे” या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले आणि त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. असं अजिंक्य म्हणतो.
कलर्स मराठी वरील बायको अशी हवी. या मालिकेत अजिंक्य आदित्य शिर्केची भूमिका साकारताना आपण पाहत आहोत. अजिंक्य आणि शिवानी एकमेकांसोबतचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात. प्रेक्षकांनाही त्यांची जोडी खूप आवडते.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.