अक्षय कुमार व जॉन अब्राहम ही जोडी पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार?

सध्या बॉलिवूडमध्ये वेगळं किंवा हटके विषयांपेक्षा रिमेक आणि सीक्वलचा फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्याच हीट चित्रपटांचे भाग २ जाहीर करण्यात आले आहेत तर काही सीक्वल्सवर काम सुरू आहे. असाच एक धमाल चित्रपटाचा दूसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया २’चे निर्माते आनंद पंडित यांनी अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या ‘देसी बॉइज’ या चित्रपटाचा दूसरा भाग येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

२०११ साली प्रदर्शित झालेला ‘देसी बॉइज’ हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५३ कोटी इतकी कमाई केली होती. चित्रपटाने फारशी चांगली कामगिरी केली नसली तरी याचा सीक्वल येणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. नुकतंच निर्माते आनंद पंडित याची पुष्टीदेखील केली आहे.

टेली चक्कर’ या ऑनलाईन पोर्टलशी संवाद साधताना आनंद पंडित यांनी अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांना एकत्र आणायची इच्छा व्यक्त केली. याविषयी बोलताना ते म्हणाले, “मी याआधीही म्हंटलं आहे की माझ्यासाठी स्क्रिप्ट फार महत्त्वाची आहे, आणि जेव्हा स्क्रिप्ट आम्हाला पटेल तेव्हाच आम्ही या चित्रपटातील कलाकारांचा विचार करू शकतो. या नव्या भागात तीच जोडी तुम्हाला दिसेल की नाही याबाबत मी साशंक आहे कारण हा चित्रपट मला आजच्या तरूणांसाठी बनवायचा आहे.”

अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. याविषयी आनंद पंडित यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. ‘देसी बॉइज’चं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांचा मुलगा रोहित धवन याने केलं होतं. जॉन आणि अक्षयसह या चित्रपटात दीपिका पदूकोण, चित्रांगदा सिंग या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. ‘देसी बॉइज २’ बरोबरच ‘द बिग बुल २’, ‘सरकार ४’ या चित्रपटांवरही आनंद पंडित काम करत आहेत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *