प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या ते या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात अभिनेता आकाश ठोसरही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच आकाश ठोसरने दिलेल्या एका मुलाखतीत नागराज मंजुळेंबद्दल भाष्य केले आहे.
आकाश ठोसर हा कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. नुकतंच त्याने ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने नागराज मंजुळे हे माझे गॉडफादर आहेत, असे म्हटले आहे. त्याच्या या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सैराट चित्रपटाच्या आधीचे माझे जीवन आणि आताचे माझे जीवन हे खरंच खूप वेगळे आहे. नाण्याला दोन बाजू असतात तशा दोन बाजू माझ्या जीवनाला आहेत. सैराटमुळे माझ्या जीवनाचा संपूर्ण ट्रॅकच बदलला. मी कधीही स्वप्नात विचार केला नव्हता की भविष्यात मी अभिनय क्षेत्रात जाईल, अभिनय करेन. तसेच मी इतक्या मोठमोठ्या चित्रपटात प्रमुख भूमिका करेन, असा मी कधीच विचार केला नव्हता.
मी जीवनात ‘सैराट’च्या निमित्ताने पहिल्यांदा मंचावर गेलो. मी कधी मंचावर गेलो नव्हतो. त्यामुळे हे सर्व अण्णांमुळे शक्य झालं. त्यांनी माझ्यात काय बघितलं आणि इतका विश्वास ठेवून सैराटमध्ये मला परश्याची भूमिका दिली, हे मला माहिती नाही. झुंड केला, आता घर, बंदूक, बिरयानी हा चित्रपट करतोय. त्यांचे काम संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. ते माणूस म्हणूनही कमाल आहेत.
त्यांच्याकडून शिकण्यासारखंही बरंच काही आहे. त्याच्याकडून पूर्ण जीवनाबद्दलच शिकायला मिळतं. तुम्हाला जीवनात कोणतरी पूश करायला, प्रेरणा द्यायला हवं असतं, माझ्या आयुष्यात ते स्थान अण्णांचं आहे. नागराज मंजुळे हे माझे गॉडफादर आहेत. आजही मला कोणतीही अडचण आली तरी मी पहिला फोन अण्णांना करतो. मला कोणताही चित्रपट ऑफर करण्यात आला, तरीही माझा पहिला फोन अण्णांना असतो. अण्णा हे असं असं आहे, हे मी त्यांना सांगतो. ते कायम एका फोनवर उपलब्ध असतात.” असे आकाश ठोसरने सांगितले.
दरम्यान नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद