सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मंदारनंतर आता त्याचा भाऊ अभिनेता मेघन जाधव देखील स्टार प्रवाहवरील मालिकेत एंट्री घेतोय.
मेघन जाधवची रंग माझा वेगळा मालिकेत होणार धमाकेदार एन्ट्री घेणार आहे. मेघन जाधव मालिकेत आर्यनची भूमिका साकारणार आहे. रंग माझा वेगळामध्ये लीप आला असून मालिकेचं कथानक १४ वर्षांनी पुढे सरकलं आहे. या १४ वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.
दीपिका कार्तिकीही आता मोठ्या झाल्या आहेत. लवकरच मालिकेत दीपिका कार्तिकीचा खास मित्र आर्यनची एन्ट्री होणार आहे. मेघनची पहिलीच मराठी मालिका आहे. याआधी त्यानं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.
सब टीव्ही वरील ‘तेरा यार हू मै’, ‘तेनाली रामा’. त्याचप्रमाणे कलर्स टीव्हीवरील ‘शुभारंभ’, ‘तंत्र’, ‘महाकाली’, ‘थोडासा बादल थोडासा पानी’ आणि सोनी टीव्हीवरील ‘सूर्यपुत्र कर्ण’, सारख्या हिंदी मालिकेत मेघननं काम केलं आहे. मराठी मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मेघन म्हणाला, “मी हिंदी मध्ये बरंच काम केलं आहे. पण माझ्या करियरची सुरुवात मराठी सिनेमानेच झालीय. रंग माझा वेगळा ही माझी मराठीतील पहिली मालिका आहे”.
या भूमिकेला दोन शेड्स आहेत. तो मनाने चांगला आहे मात्र तो एका मिशनवर आला आहे. आर्यन कुणाच्या सांगण्यावरून हे करतोय हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल”. माझा भाऊ मंदार जाधव माझ्या या नव्या प्रोजेक्टसाठी खुपच उत्सुक आहे. स्टार प्रवाहसोबत मी काम करावं अशी त्याची इच्छा होती जी आता पूर्ण होतेय”, असंही मेघन म्हणाला.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद