रिंकू राजगुरुसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेवर आकाश ठोसरनं सोडलं मौन, म्हणाला

सैराट (Sairat Movie) चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Aakash Thosar) घराघरात पोहचली. महाराष्ट्रात ते दोघं आर्ची-परशा या नावाने ओळखले जातात. सैराट चित्रपटामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगही खूप वाढले. रिंकू आणि आकाश प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतात. ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळत असते. दरम्यान आता आकाश ठोसरने यावर मौन सोडले आहे.

आकाश आणि रिंकू यांची मैत्री खूप चांगली आहे. एकमेकांना भेटल्यावर हे दोघेही आपल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या दोघांनी आता लग्न करायला हरकत नाही किंवा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेर अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर आकाश आणि रिंकूला याची फार गंमत वाटते. खरेतर अशा फोटोंवर फार मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात असल्याने हे दोघे फोटो पोस्ट करून त्याची फक्त मजा घेत असतात. पण हे लोकांचे प्रेम आहे, या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, हे यश गाठू शकलो आहोत, असे आकाश सांगतो.

तो पुढे म्हणाला की, आम्ही दोघेही एकमेकांना डेट करत आहोत या सगळ्या अफवा आहेत. आम्ही खूप चांगले मित्र आहोत यापलीकडे काहीच नाही. आकाशला लग्नासाठी कशी मुलगी हवी? या प्रश्नावर तो म्हणतो की जी मुलगी बिरयाणी खूप छान बनवेल तिच्याही मला लग्न करायला आवडेल. कारण जिला बिर्याणी बनवता येते तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो. मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो. कारण मी पहिलवान बनण्यासाठी जिथे जात होतो तिथे प्रत्येकालाच स्वतःचे जेवण स्वतःला च बनवायला लागायचे. त्यामुळे पोळी, भाजी, बिरयाणी असं मी आता सगळा स्वयंपाक खूप छान बनवू शकतो.

आकाश ठोसर लवकरच घर बंदुक बिरयाणी या सिनेमात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत सायली पाटील, नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ७ एप्रिल, २०२३ ला प्रदर्शित होणार आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *