दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले दोन कलाकार म्हणजे आर्ची आणि परश्या. या चित्रपटात आर्चीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरुने साकारली होती. तर याच चित्रपटात अभिनेता आकाश ठोसर हा परश्याच्या भूमिकेत दिसला होता. सैराट हा चित्रपट हिट झाल्यापासून सातत्याने त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र नुकतंच आकाश ठोसरने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
अभिनेता आकाश ठोसर हा लवकरच घर, बंदूक, बिरयानी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केले आहे. नुकतंच आकाशने एक मुलाखत दिली. त्यावेळी त्याला रिंकू राजगुरुबरोबर फोटो शेअर करण्यापासून ते अफेअरबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने थेट उत्तर दिले.
मी आणि रिंकू जेव्हा एकमेकांबरोबरचे फोटो टाकतो, तेव्हा मला खूप मज्जा आहे. मला एकट्यालाच नाही तर रिंकूलाही या गोष्टी फार मजेशीर वाटतात. जेव्हा आमच्यापैकी कोणीही पोस्ट करतं तेव्हा आम्ही एकत्र असतो. आता फक्त मजा बघ, असे आम्ही एकमेकांना सांगत असतो.
आर्ची आणि परश्याची जोडी लोकांना खूप आवडली. ते आजही त्या जोडीला तितकंच प्रेम देतात. अनेक लोक ही जोडी पुन्हा पडद्यावर दिसावं यासाठी वाट बघत आहेत. आम्हाला चांगली स्टोरी मिळाली तर नक्कीच पुन्हा स्क्रीन शेअर करु. तुम्ही फोटोखाली कमेंट करता, त्या वाचून आम्ही मज्जा घेत असतो”, असेही तो म्हणाला.
पण हे लोकांचं प्रेम आहे, त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आम्ही दोघेही एकमेकांना डेट करत आहोत या सगळ्या अफवा आहेत. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. यापलीकडे आमच्या दोघांत काहीच नाही”, असे आकाश ठोसरने सांगितले.
दरम्यान आकाश ठोसर हा लवकरच ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद