मराठीतील गुणी अभिनेत्री अमृता सुभाष नावामागे आडनाव लावत नाही. हिचं खरं आडनाव तुम्हाला माहित आहे का? लग्नाआधी अमृताचं नाव अमृता ढेंबरे असं होतं. लग्नानंतर अमृता संदेश कुलकर्णी असं तिचं पूर्ण नाव आहे.
गोड चेहऱ्याची ‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीव ही सुद्धा आपल्या नावापुढे फक्त वडिलांचं नाव लावते. सायली संजीव चांदसारकर असं तिचं पूर्ण नाव आहे.
जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर याचं पूर्ण नाव काय? तर ललित प्रभाकर भदाणे. भदाणे हे आडनाव न लावता ललितने ललित प्रभाकर हे नाव स्वीकारलं.
महाराष्ट्रीची हास्यजत्रा या सुपरहिट शोमधून लोकप्रिय झालेला पृथ्वीक प्रताप याचं पूर्ण नाव पृथ्वीक प्रताप कांबळे असं आहे.
मुलगी झाली हो या लोकप्रिय मराठी मालिकेत माऊची भूमिका साकारणारी दिव्या सुभाष हिचं पूर्ण नाव दिव्या पुगावकर आहे.
राधा सागर ही आई कुठे काय करते या मालिकेमुळे प्रकाशझोतात आली. या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणाऱ्या राधा सागरचं पूर्ण नाव राधा कुलकर्णी असं आहे. मात्र ती नवऱ्याचं फक्त सागर हे नाव लावते.
आपल्या सुरेल स्वरांनी चाहत्यांना वेड लावणारे अजय-अतुल हे सख्खे भाऊ आहेत. त्यांचं पूर्ण नाव अजय गोगावले आणि अतुल गोगावले असं आहे. मात्र आडनाव न लावता ही जोडी अजय-अतुल नावाने लोकप्रिय झाली.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद