बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची चाळीशी उलटली आहे. मात्र आतापर्यंत लग्न करून आपला संसार थाटलेला नाही. या अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये नव्हत्या असं नाही. त्यांची लव्ह लाइफही खूप चर्चेत राहिली. मात्र त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. या अभिनेत्री पुढीलप्रमाणे.
कहो ना प्यार है आणि गदर या चित्रपटांमुळे स्टार बनलेली अमिषा पटेल आता ४७ वर्षांची झाली आहे. मात्र तिचं अद्याप लग्न झालेलं नाही. अमिषाचं नाव कधीकाळी विक्रम भटशी जोडलं गेलं होतं. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही ५२ वर्षांची आहे. मात्र आतापर्यंत तिने लग्न केलेलं नाही. तब्बू सांगते की तिला आतापर्यंत परफेक्ट पार्टनर मिळालेला नाही. त्यामुळे तिने लग्न केलेलं नाही. तब्बूचं नाव कधीकाळी दक्षिणेतील स्टार नागार्जुन याच्याशी जोडलं गेलं होतं.
शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी हिचंही लग्न झालेलं नाही. ४४ वर्षांची शमिता गतवर्षी राकेश बापटसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. त्यापूर्वी शमिताच्या अनेक रिलेशनशिप अपयशी ठरल्या होत्या. तसेच ती लग्न करू शकली नव्हती.
काजोलची बहिण तनिषा मुखर्जी ही ४५ वर्षांची आहे. मात्र तिने आतापर्यंत लग्न केलेलं नाही. तनिषा सांगते की, तिला आतापर्यंत मनासारखा जोडीदार मिळालेला नाही. त्यामुळे मी विवाह केलेला नाही. तिने तिचे एग्स फ्रिज करून ठेवले आहेत. त्यामुळे उशिरा लग्न झालं तरी तिला आई बनण्यास काहीही अडचण येणार नाही.
सुश्मिता सेन ही ४७ वर्षांची झाली आहे. तिची लव्ह लाइफ नेहमीच चर्चेत असते. मात्र तिने आतापर्यंत लग्न केलेलं नाही. तिचं नाव काही दिवसांपूर्वी ललित मोदींशी जोडलं गेलं होतं. सुश्मिता सेनने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. त्यांची देखभाल ती करत आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद