भारताचे 5 क्रिकेटर ज्यांनी परदेशी तरुणींसोबत थाटला संसार

हार्दिक पांड्या – भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याने सार्बियन मॉडेल नताशा स्टानकोविकसोबत १ जानेवारी २०२० रोजी साखरपुडा केला आणि मे महिन्यात लग्न केलं. दोघांना ३० जुलै २०२० रोजी एक मुलगाही झाला. कोरोनामुळे थोडक्यात लग्न आटोपल्याने दोघांनी २०२३ मध्ये पुन्हा एकदा ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. सायबेरियात जन्मलेली नताशा २०१२ मध्ये भारतात आली होती. बॉलिवूडमध्ये तिने काही चित्रपटात आयटम डान्स आणि लहान भूमिकासुद्धा केल्या.

इरफान पठाण : भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सौदी अरबची मॉडेल सफा बेगसोबत लग्न केलं होतं. दोघांनी मक्कामध्ये लग्न केलं. इरफान पठाण आणि सफा यांच्यात १० वर्षांचं अंतर आहे. दोघेही २०१४ मध्ये एका सोशल इव्हेंटमध्ये भेटले होते. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानतंर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. इरफानसोबत लग्नानंतर सफा बेगने मॉ़डेलिंग बंद केलं आहे.

युवराज सिंग : भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटर युवराज सिंगने अमेरिकन स्थित हेजल कीचसोबत २०१६ मध्ये लग्न केलं. हेजल किच २००५ मध्ये मुंबईत आली होती. तिने २०११ मध्ये बॉलिवूड चित्रपटात कामही केलं होतं. त्यावेळी एका मित्राच्या पार्टीत हेजल कीच आणि युवराज सिंग यांची भेट झाली होती. हेजल आणि युवराज यांना २०२२ मध्ये मुलगा झाला.

शिखर धवन : भारतीय संघाचा सलामीवीर शिखऱ धवनने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. भारतात जन्मललेली आयशा वयाच्या ८ व्या वर्षी आई-वडिलांसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. आय़शा आणि शिखर धवन यांची फेसबुकवर ओळख झाली होती. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगासुद्धा आहे. शिखर धवनशी लग्नाअगोदर आयशाचा घटस्फोट झाला होता. आता शिखर धवनसोबत २०२१ मध्येही तिने घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं.

मनदीप सिंह : भारताचा क्रिकेटपटू मनदीप सिंहने ब्रिटनमध्ये जन्मलेल्या जगदीप जसवालसोबत डिसेंबर २०१६ मध्ये लग्न केलं . जगदीप मेकअप आर्टिस्ट आहे. भारतात आल्यानंतर एका मित्रासोबत जगदीप आणि मनदीप यांची भेट झाली होती. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या मनदीपच्या लग्न सोहळ्यात महेंद्र सिंह धोनी आणि हरभजन सिंग सहभागी झाले होते.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *