रशियन मुलींचा वापर करुन केली सतीश कौशिक यांची हत्या? धक्कादायक माहिती समोर

अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश मालू यांच्या निधनानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशात दिल्ली पोलीस सतीश कौशिक यांचं निधन नक्की कोणत्या कारणामुळे झालं या गोष्टीचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे उद्योजक विकास मालू यांची पत्नी सान्वी मालू पतीवर सतत गंभीर आरोप करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र सतीश कैशिक यांच्या निधनानंतर खळबळ माजली आहे. सतीश कौशिक यांच्या हत्येसाठी विकास मालू यांनी रशियन मुलीचा वापर केल्याचा धक्कादायक खुलासा सान्वी मालू यांनी केला आहेत. सान्वी मालू यांच्या आरोपांनंतर विकास मालू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र सान्वी मालू यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे.

एका मुलाखतीत सान्वी मालू यांनी सतीश कौशिक यांच्या निधनानंतर धक्कादायक खुलासा केला आहे. सान्वी म्हणाल्या, ‘सतीश कौशिक आणि विकास मालू यांच्यात पैशांवरुन वाद होते. गेल्या वर्षी दोघांचे वाद झाले. सतीश यांनी माझ्या पतीला १५ कोटी रुपये दिले होते, स्वतःचे पैसे सतीश परत मागत होते. पण विकास यांच्याकडे पैसे परत करण्यासाठी काहीही नव्हते. विकास तेव्हा परदेशात होते.. ‘

सान्वी पुढे म्हणाल्या, ‘भारतात आल्यानंतर तुमचे पैसे परत करेल असं विकास म्हणाले. पण कोरोना काळात मोठं नुकसान झाल्यामुळे १५ कोटी परत करण्यासाठी विकास असमर्थ होते. एवढंच नाही तर, सतीश सतत पैशांची मागणी करत आहेत, त्यांची हत्या करण्यासाठी मी ब्ल्यू पील्स आणि रशियन मुलीचा वापर करणार असल्याचं देखील विकास यांनी मला सांगितलं.’ सान्वी यांनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर सतीश कौशिक याच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सतीश कौशिक यांचं निधन हृदय विकाराच्या झटक्याने झालं असं सांगण्यात आलं. पण दिल्ली पोलीस सतीश कौशिक यांच्या निधनाीची कसून चौकशी करताना दिसत आहेत. मृत्यूप्रकरणी पोलीस सतीश कौशिक यांच्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात आहेत.

ज्या फार्म हाऊसमध्ये पार्टी सुरु होती, त्या ठिकाणी देखील पोलिसांनी तपासणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी ज्या फार्म हाऊसमध्ये सतीश कौशिक यांनी होळीची पार्टी केली होती. त्याठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी काही औषधं जप्त केली आहेत. यामध्ये सतीश यांची नियमीत ओषधं होती. याशिवाय काही औषधं तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी कोणती गोष्ट समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *