स्टार प्रवाह वरील फुलाला सुगंध मातीचा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. यातील शुभम कीर्ती आणि जिजी आक्कांच्या भूमिकेवर पण प्रेक्षक खूप प्रेम करतात. पण ही मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मालिकेतील काही दृश्यांवर आक्षेप घेत एलजीबीटीक्यू कम्युनिटीने या मालिके विरोधात एफ आय आर दाखल केल्याचे कळते. एस वी एक्झिस्ट नावाच्या एका इंस्टाग्राम पेज वरून याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
या पोस्टवर असे कळत आहे कि या मालिके विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पण अजूनही मालिकेच्या निर्मात्यांनी व चॅनेलनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत शुभम म्हणजेच हर्षद अख्तरी एका पाककला स्पर्धेत भाग घेतो.
या स्पर्धेत वेगवेगळे स्पर्धक सहभागी होतात. यातला एक स्पर्धक सँडी हा समलैंगिक आहे. ही भूमिका अभिनेता अजिंक्य पितळे याने साकारली आहे. यातच सँडी आणि जिजी अक्कावर चित्रित दृश्यांवर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
जिजाअक्का सँडीला त्याच्या राहणीमाना वरून हिणवतात.असे वागू नको असा सल्ला देतात. त्याला जिम मध्ये जाऊन शरीर कमावण्याचाही सल्ला देतात. यावरच एस वी एक्सिस्टने आक्षेप घेत एफआयआर दाखल केली आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.