अभिनेत्री रुपाली भोसले चा खडतर जीवन प्रवास

आई कुठे काय करते मालिकेमध्ये संजना हे पात्र आता अभिनेत्री रुपाली भोसले साकारते. अगोदर संजना हीच भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरे साकारत होती. आज आपण नव्या संजनाबद्दल म्हणजे रुपाली भोसले बद्दल जाणून घेणार आहोत. तिची कहाणी खरतर खूप प्रेरणादायी म्हणता येईल.

अभिनेत्री रुपाली भोसले हीचा जन्म २९ डिसेंबर १९८३ मुंबईत झाला. पण तिचे मूळ गाव वेल्ले तालुक्यातील खोपे शिरगाव असं आहे. रुपालीच्या वडिलांचे नाव आकाश भोसले तर आईचे नाव प्रज्ञा भोसले असून तिला एक भाऊ आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे आईवडील मुंबईत आले त्यामुळे रुपालीच्या शालेय शिक्षणही मुंबईतच पूर्ण झाले.

घर चालवण्यासाठी रुपालीची आई हातगाडीवर खानावळ चालवायच्या. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी रुपालिने आईला हातगाडीवर मदत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कॉलेज करता करता रिसेप्शननिष्ट म्हणून आणि कॉल सेंटरमध्येही तिने काम केले. तिने कॉमर्स मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

हे सगळं करत असताना ती एक स्वप्न नेहमी पाहत राहिली की तिला अभिनेत्री व्हायचंय आणि त्या दिशेने कामही करत राहिली. हळूहळू तिने नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. नाटक,कॉलेज आणि काम हे एकत्रित करत असताना तिची नेहमीच फरफट व्हायची.पण स्वप्नांचा पिछा तिने सोडला नाही.

नाटकानंतर ‘ एक झोका नियतीचा’ या मराठी मालिकेतून तिने टि व्ही मनोरंजनाच्या विश्वात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केले. दरम्यान २०१२ मध्ये इंग्लंड मध्ये आय टी इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या मिलिंद शिंदे याच्याशी रुपालीच लग्न झाले. पण काही कारणाने त्यांचा घटस्फोट झाला. यातही खचून न जाता रुपाली परत अभिनयासाठी सज्ज झाली.

‘बडी दूर से आये है’ या हिंदी मालिकेतून रुपालीने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकले. या मालिकेत तिला अक्षय कुमार आणि सुमित राघवन या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. बिग बॉस २ मध्येही तिने सहभाग घेतला होता. बडी दूर से आये है आणि बिग बॉस मुळे रुपाली चांगलीच प्रकाश झोतात आली.

त्यानंतर आता आई कुठे काय करते मालिकेत रुपाली “संजना” ही भूमिका साकारते. तिची ही भूमिका नकारात्मक आहे. तर ही होती एका हातगाडीवर काम करणारी मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसलेची खरी कहाणी.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *