श्रीकृष्णाच्या मते आपण जर गाईला हे फळ खायला दिले. तर आपल्या जीवनातील सर्व कष्ट बाधा अडचणी व संकटांचा नाश होतो. देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. श्रीकृष्ण सांगतात की गाय ही संपूर्ण सृष्टीची माता आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचे वास्तव्य असते. गायीची सेवा केल्यास संपूर्ण सृष्टी ची सेवा केल्याचे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते.
आपण जर गाईची सेवा केली. तर आपल्या जीवनातील सर्व कळत नकळत पाप कर्मांचा अंत होतो. आपल्या जन्मोजन्मीच्या पापांचा नाश होऊन आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. गाईची सेवा करणारे व्यक्ती मृत्युनंतर गोलोकात जाऊन श्रीकृष्णनांसोबत वास्तव्य करतात. गाय ही हिंदू धर्मात खूप पूजनीय आहे.
तसे तर प्रत्येक पशु पूजनीय आहे. हिंदू धर्मात अनेक जीवजंतूना पशूंना पूजले जाते. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक प्राणिमात्रांवर दया व करुणा करावी असे सांगितले जाते. परंतु गाईला खूपच पवित्र मानले जाते. हिंदू पुराणांनुसार गाईला कामधेनूचे रूप मानले जाते. कामधेनु देवी आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करते.
गाईची पूजन केल्यास सर्व प्रकारच्या देवी-देवतांचे पूजन केल्याचे पुण्य फळ आपल्याला मिळते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की गाईला प्रसन्न करून तिची कृपा मिळवण्यासाठी गाईला दररोज कोणते फळ खाऊ घालावे ते? हे फळ देवी कामधेनू ला अतिप्रिय आहे. गाईच्या शिंगांच्या पुढील भागात साक्षात श्रीहरी स्वरूप वेद व्यासांचे वास्तव्य असते.
म्हणून आपल्या दारात जर गाय आली किंवा आपल्या घरी गाय असेल. तर तिच्या कपाळावर आपले डोके टेकवून तिला नमस्कार करावा. गाईच्या शिंगांच्या मुळात देवी पार्वती व शिंगांच्या अग्र भागात देवाधिदेव महादेवांचे वास्तव्य असते. म्हणून गाईच्या शेंगांच्या मुळांवर कुंकू अर्पण करून देवी पार्वतीला नमस्कार करावा.
व शिंगांच्या मध्यंनाही नमस्कार करून महादेवांचे ध्यान करावे. गोमातेच्या मस्तकात ब्रह्मदेव खांद्यावर बृहस्पति व कपाळावर ऋषभारुढ देवाधिदेव महादेव. कानामध्ये अश्विनीकुमार डोळ्यात सूर्यदेव व चंद्र देव निवास करतात. अशाप्रकारे गायीची सेवा केल्यास आपल्याला सर्व देवी-देवतांचे एकत्रित आशीर्वाद प्राप्त होतात.
गोमातेच्या दातांमध्ये सर्व ऋषीमुनी. जिभेमध्ये देवी सरस्वती तसेच वक्ष स्थळांमध्ये सर्व देवी देवता वास्तव्य करतात. गोमातेच्या पायांच्या खुरांच्या मध्यभागात गंधर्व. अग्र भागात शेषनाग. तसेच मागील भागात मुख्य अप्सरांचे वास्तव्य असते. गायीच्या मागील भागात पितृगण तर भ्रूकुटी मुळांमध्ये तिन्हीगणांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते.
गाईच्या रोमछिद्रांमध्ये ऋषि गण तर कातडीमध्ये प्रजापती वास्तव्य करतात. गाईच्या पाठीत यमदेव. अपार देहात संपूर्ण तीर्थ तसेच गोमूत्रामध्ये साक्षात देवी गंगा वास्तव्य करते. अशाप्रकारे गाईच्या शरीरात सर्व देवी-देवतांचे वास्तव्य आहे. गाईला शुद्ध पाण्याने स्नान घालून तिला पोळी खायला द्यावी. पुराणानुसार गाईला दररोज केळी खायला दिल्यास.
आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. केळी श्रीहरी विष्णूंना अतिप्रिय आहे. म्हणून गाईला केळी खायला दिल्यास आपल्या जीवनातील दुःख त्रास संकटे अडचणी व बाधा सर्व काही नष्ट होतात. म्हणून दारात आलेल्या गाईला दररोज केळी खायला द्यावी. यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या धनात वाढ होईल.
आपल्या दारात जर गाय येत असेल तर तिचे पूजन करून तिचे नित्यनियमाने दर्शन घ्यावे व केळीचा नैवेद्य द्यावा. शक्यतो घरात बनवलेली पहिली पोळी हि गाईला खायला द्यावी. असे केल्याने देवी कामधेनूची कृपा आपल्यावर होते आणि आपल्याला जीवनात कधीही आर्थिक व मानसिक संकटांचा सामना करावा लागत नाही. या आहेत गोमातेविषयी काही महत्वाच्या बाबी. ज्या आपले जीवन समृद्ध व प्रगत करू शकतात.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.