अक्षय कुमार माझ्यासाठी देवदूत…’ इम्रान हाश्मीचा मोठा खुलासा; नेमकं काय केलं खिलाडी कुमारने?

बॉलिवूडमधील सीरियस किसर अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. लवकरच बऱ्याच दिवसांनी तो अक्षय कुमारसोबत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता इम्रानने अक्षयबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे त्याची सध्या चर्चा होतेय.

‘सेल्फी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात इम्रान आणि अक्षय या दोघांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. ‘सेल्फी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात इम्रान आणि अक्षय या दोघांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमात इम्रानने अक्षयला ‘देवदूत’ म्हटले आहे कारण अक्षय कुमार ही पहिली व्यक्ती होती जिने इम्रानच्या मुलाला कर्करोग झाल्याचं कळताच त्याच्याशी संपर्क केला होता.

इम्रानने 2006 साली परवीन शहानीबरोबर लग्न केले. 2010 साली ते पालक बनले. 2014 साली त्यांच्या मुलाला अयानला कर्करोग झाल्याचे निदान झाले.

एका मुलाखतीत बोलताना तो अक्षय कुमारविषयी म्हणाला कि, ‘माझ्या मुलाच्या तब्येतीची समस्या असताना तो माझ्यासाठी तिथे होता. तो पहिला माणूस होता ज्याने मला फोन केला, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी तो उभा होता.’

तो पुढे म्हणाला, ‘तेव्हा मी त्याला नीट ओळखत नव्हतो. तुमच्या चांगल्या काळात तुमच्याबरोबर चांगले लोक असतात पण वाईट काळात वाईट काळात तुमच्याकडे येणारे देवदूत असतात. अक्षय त्यापैकी एक आहे.’ अशा शब्दात त्याने अक्षय कुमार बद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.

दरम्यान अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ 24 फेब्रुवारीला ‘प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात या दोघांबरोबर नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटात दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *