देवाची आरती अशी करा मिळेल इच्छित लाभ वरदान

आरती करताना जोरजोराने ओरडणे. टाळ घंटी वाजविणे. म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणजे देवतांच्या अस्तित्वाची साक्षात अनुभूती अर्थतेने अंतःकरणपूर्वक केलेली ईश्वराची आळवणी म्हणजे आरती. देवाबद्दलच्या मनातील सर्व भावना एकवटून अत्यंत आर्ततेने गायली जाते. ती आरती भक्ताच्या हृदयातील भक्तिदिप तेजमय करण्याची आणि देवतेकडून कृपा आशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती.

भगवंत प्रत्यक्ष समोर आहे. आणि मी त्याची आळवणी करत आहे. या भावनेने आरती म्हणतात. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणतात. आरती म्हणताना शब्द उच्चार योग्य असावा लागतो. देवतेचे तत्त्व म्हणजे शक्‍तीतत्त्व हा तारक मारक शक्तीचा संयोग आहे. त्यामुळे देवतेच्या आरतीतील शब्द हे अल्प मध्यम वेगाणे आणि अर्थ चालित तसेच उत्कंट वात म्हणने इष्ट ठरते.

आरती म्हणजे आर्ततेने केलेली ईश्वराची आळवणी. कुठलीही आरती प्रभावी करण्यासाठी त्यातील तीन अंगांवर महत्त्वाची ठरतात. पहिले अंग म्हणजे त्या आरतीतील शब्द. दुसरे म्हणजे त्यातील संगीत किंवा आरतीची चाल. तिसरे अंग म्हणजे म्हणनाऱ्याची कथा शब्दातील सामर्थ्यता हे ईश्वर प्रेम श्री सद्गुरू प्रेम व्यक्त करते.

तर राग रागिनी वर आधारित असलेल्या संगीताने वातावरणात वेगळीच स्पंदने निर्माण होतात. त्याचप्रमाने म्हणनाऱ्याची आर्तता हे त्याच्या आत्मिकविकासाची प्रचिती देत असते. ईश्वराची भक्ती करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे आरती. मठात किंवा मंदिरात म्हटल्या जाणाऱ्या आरतीच्या वेळी जर का आपण उपस्थित राहिलो.

तर निश्चितच आपण ईश्वराच्या म्हणजे आपल्या सदगुरूंच्या जवळ जात असतो. सामुदायिक केलेल्या आरतीला अत्यंत महत्त्व आहे. आपल्या आयुष्यात कारण सामुदायिक केलेली आरती भजन प्रार्थना लवकर फलद्रूप होते असे म्हणतात. आपल्या मनातील इच्छा सद्गुरूंच्या मिळवल्याने आपली स्वतःची अशी अपेक्षा राहत नाही. श्री सद्गुरूंची इच्छा हीच एकमेव इच्छा होते.

आरती आपल्या आयुष्यात महत्त्वाचे कार्य करते. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आरतिच्या माध्यमातून आपण जरी ईश्वराच्या चरणी लीन होत असतो. नतमस्तक होत असतो. जर कुणाला मंत्र म्हणता येत नसतील. पूजा अर्चना कशी करावी. हेही माहीत नसेल. पण ती व्यक्ती आरती करीत असेल तर देव त्याची पूजा पूर्णपणे स्वीकारतात.

आपण आता पाहुयात आरती का करावी. आपल्या आराध्य देवतेच्या काही त्रुटी राहून गेल्यास त्याची पूर्तता आरती केल्याने पूर्ण होत असते. तसेच सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणातील तेजतत्वाने प्रमाण घटू लागल्याने वायूमंडलातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते. तसेच रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीचे प्रमाणही वाढते. या संधीचा लाभ उठवून वाईट शक्ती वातावरणातील आपला संचार वाढवतात.

अशा रज-तमात्मक वायू मंडळाचा त्रास होऊ नये. यासाठी आरतीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरी कुलदेवतांच्या लहरींना आवाहन करून त्यांना ब्रम्हांड कक्षात आणणे आवश्यक असते. आरती मुळे वायूमंडलात देवतांच्या चैतन्यमय लहरींचे प्रमाण वाढवून त्रासदायक स्पंदणांचे प्रमाण घटते. आणि जिवाच्या देहा भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

आरती केल्याने आपल्या भक्तिभावना पवित्र होऊन जातात. सोबतच आरती करताना गाईच्या तुपाचा वापर आणि शंख वाजवल्याने वातावरणातील हानीकारक किटाणूचा नायनाट होतो. विष्णु पुराणात सांगितल्या नुसार जो मनुष्य रोज धुप आरती करतो. तो आपल्या कित्येक पिढ्यांचा उद्धार करतो. धूपदीप आरती केल्याने वातावरणातील विषारी वायू जाळून प्राणवायू सोबतच अतिसूक्ष्म ओझोन समिष्रण तयार होते.

रक्‍त शुद्ध होत जाते. तसेच डोक्याला थंडावा मिळतो. आरती करीत असताना शंख घंटा वाजवल्या शिवाय आरती पूर्ण होत नसते. सन 1928 मध्ये बर्णील युनिव्हर्सिटीच्या संशोधनात सिद्ध झाले आहे. शंख ध्वनीच्या लहरी तरंगांमुळे संक्रमित किटानुंचा नायनाट होतो. प्रतिसेकंद 27 घनफूट वायू शक्तीने वाजविण्यास शंख ध्वनी लहरींमुळे बाराशे फूट दूर पर्यंतचे विषारी जंतू की त्यांचा नायनाट होतो.

आणि 26 फूटपर्यंत दूरचे जनतू किटाणू बेशुद्ध होतात. शिखागा येथील डॉक्टर डी ब्राय यांनी 13 बधिर व्यक्तींना शंखाच्या ध्वनीच्या मदतीने चेतनावस्थेतआणले आहे. मित्रांनो आता आपल्या लक्षात आले असेल की आरती का करावी. व आरतीचे काय महत्व आहे ते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *