ईशान किशनला वॉर्निंग! पुन्हा चूक केल्यास वनडे सामन्यातून होणार निलंबन

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या वनडे मालिका सुरु आहे. या वन डे मालिकेवर सुरुवातीपासूनच भारताने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. हैद्राबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय मिळवला. तर रायपूर येथे झालेल्या सामन्यातही भारत न्यूझीलंडवर ८ विकेट्सने विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. या विजयात भारताच्या दिग्गज खेळाडूंसह युवा खेळाडूंचाही मोलाचा वाटा आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामान्या दरम्यान भारताचा विकेटकिपर आणि फलंदाज ईशान किशन यांच्याकडून एक चूक झाली. ईशानने केलेल्या एका चुकीमुळे ईशान किशन याला आयसीसीकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. ईशान किशनने हीच चूक पुन्हा केल्यास त्याचे 4 वनडे सामन्यातून निलंबन केले जाऊ शकते.

ईशान हैद्राबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना विकेट किपींग करीत होता. यावेळी न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथम हा क्रीझवर होता. यावेळी ईशानने स्वतःच्या हातातील ग्लोझने स्टम्प पाडून टॉमच्या विकेटसाठी अपील केले. यात ईशानने स्‍क्‍वेअर लेग अंपायरला फसवण्याचा प्रयत्न केला.

परंतु रिप्लेमध्ये ईशानचा हा खोडसाळपणा लक्षात आला. त्याने रिकाम्या ग्लोझने मुद्दाम स्टॅम्प पाडल्याची गोष्ट अंपायरला लक्षात आली. यानंतर पुन्हा अशी चूक न करण्याची सक्त ताकीद ईशान याला देण्यात आली आहे.

खरंतर ईशानने जी चूक केली त्या चुकीसाठी त्याला 4 वनडे सामन्यांतुन निलंबित केले जाऊ शकत होते. परंतु ईशान किशनला आयसीसी अंपायर्सनी केवळ वॉर्निंग देऊन सोडून दिले. तेव्हा यापुढे ईशानला अशा प्रकारचा खोडसाळपणा करताना दोनदा विचार करावा लागेल.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *