कोण जिंकणार बिग बॉस १६? फायनलआधीच समोर आलं या स्पर्धकाचं नाव

बिग बॉस १६ आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कार्यक्रमातील अंतिम फेरी आता जवळ आली आहे. त्यामुळे आता यावर्षी बिग बॉसचा विजेता कोण होणार, याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात दिसून येत आहे. तसं पाहायला गेल्यास सर्वजण आपल्या आवडत्या स्पर्धकाचं नाव भावी विजेता म्हणून घेत आहेत. मात्र अंतिम फेरीपूर्वी बिग बॉस १६ मधील एका स्पर्धकाच्या नावाची संभाव्य विजेता म्हणून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

बिग बॉस १६ मध्ये जेवढे स्पर्धत आहेत. त्यामध्ये शिव ठाकरे आणि प्रियंका चाहर चौधरी यांच्याकडे विजेतेपदाचे सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. शिव आणि प्रियंका सुरुवातीपासूनच जबरदस्त गेम खेळत आहेत. त्यांचा गेम प्लॅन आणि स्ट्रॅटर्जीचं कौतुक होत आहे. मात्र या दोघांमधून विजेता कोण होईल? हा मोठा प्रश्न आहे.

बिग बॉस १६ च्या संभाव्य विजेत्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरूआहे. तसेच यावेळी बिग बॉसच्या विजेतेपदाची ट्रॉफी प्रियंका चाहर चौधरी जिंकेल, असा दावा केला जात आहे. The Khabri ने सुद्धा त्याच्या अंदाजामध्ये प्रियंकाला बिग बॉस १६ चा विजेता म्हटले आहे. ट्विटमध्ये दावा करण्यात आला की, प्रियंका चाहर चौधरी बिग बॉस १६ जिंकणार आहे. तसेच हे ट्विट सेव्ह करून स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

The Khabri ने आत्मविश्वासपूर्वक हा दावा केला आहे की, यावर्षी बिग बॉस प्रियंका जिंकणार आहे. अनेक फॅन्स क्लबनीसुद्धा प्रियंकाला विजेता म्हटलं आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियंकाचं नाव सर्वात आघाडीवर आहे. तर शिव ठाकरे प्रियंकाला टक्कर देत आहेत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *