अखेर समोर आलंच आलियाच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमागचं सत्य!

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला 6 नोव्हेंबर 2022 रोजी कन्यारत्न प्राप्त झालं मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे. त्यांच्या लेकीचं नाव राहा कपूर आहे. राहा आता अडीच महिन्यांची आहे आणि प्रसूतीच्या इतक्या दिवसानंतर तिची आई अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला. 6 जानेवारी 2023 रोजी रणबीर-आलियाची मुलगी दोन महिन्यांची झाली. आतापर्यंत त्यांनी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. आलियाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं कॅप्शन वाचून चाहत्यांना तिच्या गरोदरपणावरून प्रश्न पडला होता

आता, अभिनेत्रीने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना ती दिसत आहे. या व्हिडिओचा आणि तिच्या दुसऱ्या गरोदरपणाच्या बातम्यांचा काय संबंध आहे, चला जाणून घेऊया…

आलियाने इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने दोन फुलं हातात धरली आहेत आणि कॅप्शनमध्ये ‘2.0’ लिहिलं आहे, ज्यामुळे तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीच्या बातमी जोर धरला आहे. हा फोटो तिच्या नवीन फोटोशूटचा आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या कपड्यांच्या ब्रँडची नवीन श्रेणी सादर केली आहे.

दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या या बातम्यांदरम्यान आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ लिंक शेअर केली आहे. ही व्हिडिओ लिंक तिच्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओची आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या कपड्यांच्या ब्रँडचं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे BTS सीन या व्हिडिओमध्ये दाखवले गेले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. अखेर अभिनेत्रीचा पोस्ट प्रेग्नेंसी लूक पाहायला मिळत आहे.

आई झाल्यानंतर चित्रपटांच्या निवडीवर काही परिणाम होईल का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती पुढे म्हणाली, ”ही गोष्ट माझ्या दृष्टीकोनालाही बदलणारी आहे. पहिल्यापेक्षा आता माझं मन खूप मोकळं झालंय असं मला वाटतं. मला माहीत नाही की काय बदल होतील, पण पुढे काय होईल हे पहायला मला आवडेल. या प्रवासासाठी मी खूपच उत्सुक आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *