लग्नासाठी महेशबाबूने मराठमोळ्या नम्रतासमोर ठेवली होती ‘ही’ अट

90 च्या काळातील बॉलिवूडच्या प्रसिद्ध नायिकांपैकी एक म्हणजे मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर होय. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ या चित्रपटाने नम्रता प्रचंड चर्चेत आली होती. अभिनेत्रीचं ‘मिस युनिव्हर्स’ व्हायचं स्वप्न थोडक्यात भंगल होतं. मात्र या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या अभिनेत्री पडद्यापासून दूर आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहे. आज नम्रता शिरोडकर आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आज आपण नम्रता आणि साऊथ सुपरस्टार पती महेश बाबूची हटके लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.

नम्रता शिरोडकर आजही प्रेक्षकांमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. नम्रताने बॉलिवूड दबंग सलमान खानसोबत आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘जब प्यार किसीसे होता है’ हा अभिनेत्रीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर अभिनेत्रीला प्रचंड लाइमलाईट मिळाली होती. मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने आपल्या फिल्मी कारकिर्दीत काही मोजकेच सिनेमे केले आहेत. मात्र या चित्रपटांनी तिला स्टार बनवलं आहे. आज अभिनेत्री चित्रपटांपासून दूर आहे.ती साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत आपलं वैवाहिक आयुष्य मोठ्या आनंदाने जगत आहे.

अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू ‘वामसी’ या साऊथ चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. या चित्रपटाच्या सेटवरच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यांनतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. परंतु लग्नानंतर नम्रताने सिनेसृष्टी सोडत सर्वांनाच धक्का दिला होता.

नम्रता शिरोडकरने यशाचा शिखरावर असताना अचानक मनोरंजन सृष्टीला रामराम करत ठोकत सर्वांनाच चकित केलं होतं. अभिनेत्रीच्या या निर्णयाने तिचे चाहते नाराज झाले होते. आजही नम्रता फारच कमी पडद्यावर दिसून येते. तिने काही जाहिरातींमध्ये काम केलं आहे. ७लग्नाच्या तब्बल 17 वर्षानंतर नम्रताने एका मुलाखतीत सिनेसृष्टी सोडण्याचं कारण उघड केलं होतं. अभिनेत्रीने खुलासा करत सांगितलं होतं की, आमच्या लग्नाच्या सुरुवातीलाच महेशने अट ठेवली होती की, लग्नानंतर मी अभिनय क्षेत्र सोडणार. कारण त्याला वर्किंग वाइफ नको होती. अभिनेत्री पुढे म्हणाली होती, माझ्याही काही अटी होत्या ज्या त्याने मान्य केल्या होत्या’.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *