नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्म शास्त्रामध्ये दान धर्माचे मोठे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की दानधर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते. दानधर्म करताना आपण ज्या वस्तू दान करतो त्याच्या कितीतरी जास्त पटीने परमेश्वर आपल्याला देत असतो. मात्र दान देणे हे पुण्यकर्म असेल तरी अशा काही वस्तू आहेत ज्या आपण दान म्हणून अजिबात देऊ नका.
खासकरून संध्याकाळी सूर्यास्तानंतर या वस्तू दान म्हणून किंवा उधार म्हणून देऊ नयेत. बऱ्याचदा आपल्या शेजारचे किंवा इतर कोणीही संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याकडे काही वस्तू मागू शकतात. काहीही झालं तरीही या पाच वस्तू चुकूनही कोणाला दान देऊ नका. या पाच वस्तू दान म्हणून दिल्याने आपल्या घरातील बरकत निघून जाते.
घरातील धनात कमतरता येते. जर आपण वारंवार या वस्तूंचे दान केले तर आपल्या घरात आर्थिक तंगी जाणवू लागते आणि घराची बरकत कधीच होत नाही. जाणून घेऊया त्या पाच वस्तू नेमक्या कोणकोणत्या आहेत ते. लसूण आणि कांदा. आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटते की कांदा आणि लसूण दिल्याने असा कोणता तोटा होतो?
लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध हा केतु ग्रहाशी आहे आणि केतू ग्रह हा अशा ग्रहांशी संबंधित आहे की जो जादू टोण्याशी संबंधित आहे. आपल्या आसपास असे अनेक लोक असू शकतात की जी कांदा आणि लसूण वापरून आपल्याला त्रास देऊ शकतात. आपल्यावर अनेक चुकीच्या गोष्टी लागू शकतात. आणि म्हणूनच सूर्यास्तानंतर लसूण आणि कांदा कोणालाच दान किंवा उधार देऊ नये.
सूर्यास्तानंतर लसूण कांदा दान देणे हे हिंदू धर्म शास्त्रानुसार अशुभ समजले जाते. दुसरी गोष्ट हळद. अनेकांना ही गोष्ट माहीत असेल की हळदीचा संबंध हा गुरू ग्रहाशी असतो. त्याशिवाय हळदीला लक्ष्मी समजले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह बलवान असतो त्या व्यक्तीच्या नशिबात अपार धनसंपत्ती येते. जर या लोकांनी सायंकाळी कोणाला हळद दान दिली तर त्यांच्या कुंडलीत असलेला गुरू ग्रह कमजोर पडू शकतो.
गुरू ग्रह कमजोर पडल्यामुळे आपल्या घरी पैशांची चणचण जाणवू लागते. पैशांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळी चुकूनसुद्धा कोणाला हळद देऊ नका. तिसरी गोष्ट पैसा किंवा मौल्यवान वस्तू. संध्याकाळी कोणालाही पैसा किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू जसे सोने चांदी अजिबात देऊ नका. आपण पैशाला, मौल्यवान वस्तुना माता लक्ष्मीचा दर्जा देतो.
आपण संध्याकाळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवतो, संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करण्याची वेळ असते. त्यामुळे माता लक्ष्मीचा दर्जा असलेल्या वस्तू सोने,चांदी,पैसा या वस्तू कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी चुकूनसुद्धा कोणाला पैसे देऊ नका.
दह्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. दही आपल्याला सुख समृध्दी प्रदान करतो. हिंदू धर्मात तसा उल्लेख सुध्दा आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर दहीसुध्दा कोणाला देऊ नका. जी व्यक्ती संध्याकाळी दही दान देईल त्याच्या आयुष्यातून सुख आणि वैभव निघून जाते. सुख आणि वैभव या दोन्ही वस्तूपासून ती वंचित राहते. त्यामुळे चुकूनही दही दान देऊ नये.
शेवटाची व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध. अनेकांना आश्चर्य वाटेल की दुधाचा थेट संबंध हा भगवान सूर्यदेव व चंद्रदेव यांच्याशी आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सोबत सुध्दा दुधाचा संबंध आहे.त्यामुळे सूर्यास्तानंतर चुकूनही दुधाचे दान करू नका. आता आपल्या लक्षात आलेच असेल की संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणकोणत्या वस्तूंचे दान करू नये ते.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.