मेष : आजचा दिवस अनुकूल आहे त्यामुळे शारीरिक व मानसिकरीत्या तुम्ही आनंदी असाल. मुलांसंबंधी समस्यांचे निवारण करण्यात दुपारचा वेळ जाईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. सामाजिक क्षेत्रातील तुमच्या योगदानाबाबत तुमचे कौतुक होईल. उधार वसुली करण्यासाठी चांगला वेळ आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील.
वृषभ : आजचा दिवस लाभाचे योग आणेल. परंतु एखाद्या विशिष्ट कामासाठी वाट पहावी लागू शकते. त्यानंतरच कार्यविस्ताराची योजना यशस्वी होईल. शेअर-सट्टेबाजीत अचानक लाभ होईल. निश्चिंतपणे गुंतवणूक करा. संसारिक उपयोगाची व सुख साधनांची खरेदी होऊ शकते. जुन्या परिचित लोकांची भेट होऊ शकते.
मिथुन : कार्यक्षेत्रात कामावर लक्ष केंद्रित करा नाहीतर अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात पाहुण्यांच्या आगमनाने खर्चात वाढ होईल. आपल्या माणसांबरोबर बसून समस्येवर चर्चा करून तोडगा काढणे हिताचे असेल. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित आर्थिक किंवा सामाजिक कामाकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर योजना बिघडू शकते.
कर्क : मोठ्या सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने अडकलेले पैसे परत मिळतील. त्यामुळे मन आनंदी होईल. धर्माच्या कामात मन लागेल. व्यापार-व्यासायात सामान्य प्रगती होईल परंतु आर्थिक बाबतीत झटकन कोणावरही विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. कार्यक्षेत्र व सामाजिक कामात हयगय करू नका.
सिंह : आज काहीतरी नवीन करण्याच्या नादात दिवस खर्ची पडेल. कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांबरोबर संबंध प्रस्थापित होतील. त्यामुळे प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. सरकारी संस्थेकडून दूरगामी लाभ देखील होऊ शकतो. आपल्याच चुकीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. लेखक व कला क्षेत्राशी संबंधित लोकांना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.
कन्या : दिवस प्रतिकूल असेल. अपयश मिळाल्याने हताश व्हायला होईल. त्यामुळे रागात भर पडेल. कार्यक्षेत्रात पद व अधिकाराच्या महत्त्वाकांक्षेने अंतर्विरोधाची सुरुवात होईल. समस्यांचे समाधान न झाल्याने मानसिक शांती भंग होईल. लांबचा व जवळच्या यात्रेचा योग स्थगित होऊ शकतो. खरेदीवर खर्च होईल.
तूळ : आनंदी दिवस असेल. दिवसभर मजा-मस्तीचा मूड असेल. त्यासाठी महत्वाच्या कामांकडे सुद्धा कानाडोळा कराल. आपल्या माणसांकडून सुख व कौटुंबिक मंगल कार्यातून आनंद मिळेल. रचनात्मक कामात मन लागेल. विपरीत परिस्थितीमध्ये रागावर नियंत्रण ठेवा नाहीतर नुकसान होऊ शकते. घरगुती समस्यांचे निवारण होईल.
वृश्चिक : आज तुम्ही गोंधळात पडाल. या अस्वस्थतेत लाभाची संधी हाताची जाऊ शकते. परंतु आनंदी स्वभाव असल्याने मन दुःखी होणार नाही. शत्रूच्या चालींपासून व वाद-विवादा पासून लांब राहा. आई किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या साल्यानेच महत्वाचे काम करा. अनोळखी लोकांबरोबर व्यवहार करू नका. कार्यक्षेत्रात नवीन संधी अथक मेहनतीने मिळतील.
धनु : तुम्ही स्वतःच्याच कामात मग्न असाल. विरोधाकाकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. हातात घेतलेले काम पूर्ण करूनच दम घ्याल. त्यामुळे उत्साह वाढेल व वेळेवर काम पूर्ण होईल. सामाजिक क्षेत्रात ताळमेळ साधण्यात यशस्वी व्हाल. अचानक व्यावसायिक यात्रेचा योग संभवतो.
मकर : राग जास्त असल्या कारणाने जवळच्या माणसाशी भांडण होण्याची शक्यता आहे. उत्पन्न चांगले असेल परंतु वाढत्या खर्चामुळे आर्थिक स्थिती कमकुवत असेल. दुपारनंतर व्यवसायातील काही मुद्द्यांचे निवारण होईल तर लहान-सहान लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना तयारीचे पुनर्निरीक्षण करण्याची संधी मिळेल. संध्याकाळी राजकीय धन प्राप्त होऊ शकते.
कुंभ : आजचा दिवस विषम स्थितीचा असेल. तुमच्यात प्रबळ आत्मविश्वास वाढीस लागेल त्यामुळे अशक्य कामे सुद्धा सध्या करण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला लाभ मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात खर्च होऊ शकतो. कार्यक्षेत्रात नवीन योजनेकडे लक्ष दिल्यास लाभ होईल. मुलांचा स्वभाव पाहून हताश व्हाल.
मीन : शुभ दिवस आहे. व्यापार-व्यवसायात इच्छित यश मिळल्याने आनंद होईल परंतु बसल्या बसल्या काहीही न करता लाभ होईल अशी अपेक्षा करू नका. ऑफिसात अधिकाऱ्यांशी झालेले भांडण-मतभेद नुकसानीचे कारण बनतील. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांबरोबर लांबचा प्रवास करण्याचा योग आहे. सामाजिक सन्मान मिळेल व नवीन संपर्कातून नशीब उजळेल.
तुमची कुंडली व राशिभविष्य तुमच्या ग्रहांन वर अवलंबून असते. आणि त्याला अनुसरून तुमच्या जीवनात गोष्टी घडत असतात यात काही फरक देखील असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही कोणत्याही पंडित ला किंवा ज्योतिषशास्त्र ला दाखवू शकता.