शिवलिंगावर बेलपत्र कसे अर्पण करावे

नमस्कार मित्रांनो, श्रावण महिन्यात शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पूजा पद्धतीचा वापर करतो. त्यांना दूध, मध,जल,उसाचा रस अशाप्रकारचे पदार्थ अर्पण करतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं यांच्यामध्ये आहे ते म्हणजे बेलपत्र. बेलपत्र महादेवाला खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हजारो लाखो फुले वाहिली आणि एक बेलपत्र वाहिला तर ते तुम्हाला कोटी कन्यादानाचं फल प्राप्त होते.

अशाप्रकारे त्रिदलापासून ते तेरा दलापर्यंत, तेरा दल हे आपल्याला भगवंताच्या कृपेनुसार मिळालं पाहिजे. ते जर तुम्हाला मिळालं जेवढं तुम्हाला जास्त दलाची बेल मिळेल तेवढे त्याप्रमाणात ते शिवलिंगावर वाहिल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल. पण त्यामध्ये त्रिदल बेलपत्र म्हणजे महादेवाचं त्रिनेत्र आहे. ते त्रिनेत्र जे पाप नाश करणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तीन दलामध्ये त्या तीन पत्रामध्ये महादेवाचे तीन डोळे, तीन नेत्र धारण आहेत. बेलपत्र महादेवाला खूप प्रिय आहे.

यामध्ये ब्रम्हा विष्णू महेश हे त्रिदेव आहेत व माता पार्वती, माता लक्ष्मी, माता सरस्वती या तीन देवीही आहेत. त्यामध्ये गायक, वाचक आणि मानसिक पाप नाश करणारेही त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे बेलपत्र आपण सोमवारी आणि चतुर्दशीला तोडू नयेत. जर तुम्ही यादिवशी बेलपत्र तोडले आणि ते महादेवाला वाहील्यास ते क्रोधीत होतात. त्यांचा कोप तुमच्यावर होतो त्यामुळे या दिवशी बेलपत्र तोडू नये.

म्हणून हे बेलपत्र सोमवारी तुम्हाला लागणार असेल तर रविवारी तोडून तुम्हाला हवी तेवढी घ्यायची आहेत व आपल्या घरी आणायची आहेत. घरी आणून त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यातले चांगले बेलपत्र एकत्र करून खंडित बेलपत्र जे तुटलेले आहेत ते बाजूला काढायचे आणि बेलपत्राच्या दांड्याखाली एक गाठ असते ती गाठ तुम्ही बोटाने तोडून टाकायची आहे. तोडताना चाकूचा किंवा सुरीचा वापर करू नये.

जे बेलपत्र महादेवाना वहायचे आहे त्याचबरोबर खराब बेलपत्र किंवा आपण जी देठ काढलेली आहेत ते इतरत्र टाकून न देता एखाद्या झाडाच्या बुडक्यात टाकून द्यावेत. त्यामुळे त्याचे पावित्र्य वाढते. बेलपत्र देवाला घेऊन जाताना आपण काय करतो की, त्या झाडाचं बेलपत्र तोडून ते तसेच घेऊन जातो तर ते तस घेऊन न जाता ते एखाद्या पात्रात किंवा भांड्यात ते घेऊन जावे.

बेलपत्र देवाला वाहताना विषम संख्येत वाहायच असते. म्हणजेच एक तीन पाच अकरा एकावन्न किंवा एकशे आठ या संख्येत बेलपत्र वहायचे आहे. जर तुम्हाला १०८ बेलपत्र मिळाले नाही तर तुम्ही ५१ बेलपत्र वाहू शकता, जर ५१ बेलपत्र मिळाले नाहीत तर पाच बेलपत्र वाहू शकता. कमीत कमी पाच बेलपत्र शिवलिंगावर वाहावेत. तसेच एका बेलपत्रावर आपल्याला चंदनाने किंवा अष्टगंधाने ॐ नमः शिवाय लिहायचे आहे.

व त्याखाली असणाऱ्या दोन पानामधील डाव्या बाजूच्या पानावर नमः लिहायचे आहे व उजव्या बाजूच्या पानावर शिवाय लिहायचे आहे. तसेच हे लिहताना बेलपत्राची जी वरची बाजू असते मऊ व चमकदार त्या बाजूवर लिहायचे आहे. हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना उलटे करून म्हणजे जे ॐ नमः शिवाय. हा मंत्र लिहला आहे त्याचा स्पर्श शिवाच्या मस्तकावर होईल अशारीतीने वाहायचा आहे.

बेलपत्र अर्पण करताना ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा बेलपत्र अर्पण करण्याचा मंत्र आहे त्रिकलं त्रिगुणाकारम त्रीनैत्र्यचं त्रियाउदम त्रिजन्म पापसंवारम् एकविवं शिवापनम् हा तुम्ही म्हणू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता. अशाप्रकारे बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करताना आपल्या हातांनी मृगमुद्रा करायची आहे.

मृगमुद्रा म्हणजे आपल्या हाताचे पाहिले बोट ज्याला आपण तर्जनी म्हणतो हे बोट आणि करंगळी सरळ उभे ठेवायचे आहे व हाताचा अंगठा आणि मधले बोट व अनामिका बोट या तीन बोटांचे अग्रभाग म्हणजेच पुढचे टोके एकमेकांशी जुळवायची आहेत. असे केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्या हाताची रचना हरणाच्या तोंडासारखी म्हणजेच मृगमुद्रा झाली आहे.या मुद्रेच्या साहाय्याने बेलपत्र पकडुन तो आपण शिवलिंगावर वाहायचा आहे.

जर तुम्हाला बेलपत्र मिळाले नाही किंवा सोमवारच्या दिवशी तुमच्या लक्षात आले की बेलपत्र आदल्या दिवशी तोडले नाही तर अशावेळी झाडाची बेलपत्र न तोडता शिवाच्या मंदिरात जाऊन तिथे इतर लोकांना बेलपत्र शिवलिंगावर वाहिली आहेत ती घ्यावीत व स्वच्छ धुवावी आणि मग ती शिवलिंगावर वाहावे अशा प्रकारे एक बेलपत्र आपण एक महिन्यापर्यंत वापरू शकता.हे बेलपत्र खराब होत नाही.

अशाप्रकारे बेलपत्र अर्पण करून महादेवाना प्रसन्न करून मनोवंचित फलप्राप्ती , धनधान्य, आरोग्य, ऐश्वर्य, संतान प्राप्ती, संतान सुख सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेवाला बेलपत्र अर्पण करणे हे महत्त्वाचे आहे. श्रावण महिन्यात बेलपत्र वाहणे फार महत्वाचे आहे. अशाप्रकारे बेलपत्र अर्पण करून महादेवाला प्रसन्न करून घ्या.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *