नमस्कार मित्रांनो, जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी केलेला गुळाचा हा उपाय खूप यशस्वी ठरतो. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी जाणून घ्या हे खास उपाय. शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी जर आपण धन, संपत्ती, सन्मान आणि यशाची इच्छा बाळगली असेल आणि आयुष्यातील चढ उतार आपल्याला दूर करायचे असतील.
तर शुक्रवारी प्राचीन काळापासून ज्योतिषांनी सांगितलेला हा उपाय करून बघा. शुक्रवारी लहानसा गुळाचा हा उपाय आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. हा उपाय केल्यानंतर आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल आणि आयुष्य सुखमय होऊन जाईल. या उपायांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
मात्र तरीही प्राचीन काळापासून हा उपायावर लोकांचा विश्वास अबाधित आहे. जर आपण प्रत्येक शुक्रवारी देवळात जाऊन देवी लक्ष्मीचे पूजा करता आणि प्रसाद अर्पण करत असाल तर आपले काम अजूनही सोपे होईल. जर आपल्या घरात गूळ असेल तर हा उपाय केल्यास आपले नशीब चमकेल.
जाणून घ्या शुक्रवारी गुळाचा कोणता उपाय करावा. शुक्रवारी तुपाचे दान करावे. असे केल्यास आयुष्यात आनंद कायम राहतो आणि संपत्तीचा लाभ मिळतो. जर आपल्याला अपघाताची भीती वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यात गूळ ठेऊन लक्ष्मी मातेच्या मंदिरात ते दान करावे त्यानंतर मंदिरात बसून लक्ष्मी देवीची उपासना करावी,
स्त्रोत्र म्हणावे. हे केल्याने अचानक होणारे अपघातापासून आपला बचाव होऊ शकतो. जर आपल्या कुंडलीतील सूर्य कमकुवत असेल तर शुक्रवारी गूळ खाऊन पाणी पिणे सुरू करावं. जर शुक्रवारच्या दिवशी गूळ दान केला तर यामुळे आपले पूर्वज आनंदी होतात आणि आपल्याला वैभवशाली होण्याचे वरदान देतात.
शुक्रवारी ब्राम्हण आणि गरीब व्यक्तींना धान्य आणि गूळ मिळून दान करावे यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व संकटापासून सुटका होते. त्यादिवशी काळे तीळ सुध्दा दान केले जातात. त दान केल्यानंतर जीवनातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो. धन प्राप्तीसाठी शुक्रवारी उपवास ठेवावा. या दिवशी एक दक्षिणमुखी शंख पाण्याने भरून त्यातून विष्णू देवाला आभिषेक करावा.
असे सलग तीन शुक्रवार केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीची कृपा झाल्यास घरात धनसंपत्ती वैभव आणि भरभराट होईल. घरात लक्ष्मीची मूर्ती ठेवण्यापूर्वी काही नियम आहेत ते जाणून घेणे फार महत्वाचे आहे. लक्ष्मीची मूर्ती चुकीच्या दिशेला ठेवल्यास आपले मोठे नुकसान होऊ शकते. देवी लक्ष्मी धनधान्य, सुख समृध्दीच प्रतीक आहे.
प्रत्येकाला आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा असावी असे वाटते मात्र अनेकदा लक्ष्मी देवीची स्थापना करताना होणाऱ्या क्षुल्लक चूक नुकसानदायक ठरू शकते. घरात लक्ष्मीची मूर्ती आणली की देवीची आपल्यावर कृपा होईल असे अनेकांना वाटत मात्र फक्त देवी घरात आणल्याने किंवा देवीची पूजा केल्याने उपयोग होत नाही तर लक्ष्मीची योग्य ठिकाणी स्थापना करणही खूप आवश्यक असतं.
देवी लक्ष्मीची प्रतिमा जर योग्य दिशा व योग्य पद्धतीने ठेवलेली नसेल तर त्याचा फायदा होणार नाही तर नुकसानच जास्त होईल. अशाप्रकारची छोटीशी चूक नकळत लोक करतात. देवी लक्ष्मीची आपल्या देवघरात स्थापना करण्यापूर्वी त्याची दिशा माहीत असणे गरजेचे आहे तसेच लक्ष्मी सोबत कोणत्या देवतेचे पूजा करावी हे पण महत्वाचे आहे.
साधारणपणे देवी लक्ष्मी सोबत गणेशाची पूजा केली जाते मात्र याबद्दलची सर्व माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपली लहान चूक आपल्याला लक्ष्मीच्या कृपेपासून दूर करू शकते. जाणून घ्या देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आपल्या देवघरात लक्ष्मीची स्थापना कशी करावी. देवी लक्ष्मीला नेहमी भगवान विष्णूसोबत ठेवावे. अनेक घरामध्ये देवी लक्ष्मीची स्थापना गणपती बाप्पांसोबत केली जाते मात्र हे योग्य नाही.
देवी लक्ष्मीची फक्त दिवाळीच्या पुजनावेळीच गणेशाबरोबर मूर्ती स्थापन करावी मात्र इतर दिवशी देवी लक्ष्मीची पूजा भगवान विष्णूसोबत करावी. देवी लक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी आहे म्हणून त्यांची मूर्ती सोबत असावी. लक्ष्मीची उभी मूर्ती घरी आणू नये. घरात पूजा करण्यासाठी देवी लक्ष्मीची प्रतिमाही उभी कधीच आणू नये.
उभ्या लक्ष्मीची पूजा गृहस्थ आश्रमातील लोकांनी करायची नसते. घरात देवी लक्ष्मीची बसलेली मूर्ती ठेवावी. शास्त्रानुसार उभ्या स्थितीतील मूर्ती ही चालण्याच्या स्थितीतील असते आणि ती एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही त्यामुळे घरात लक्ष्मीची बैठी मूर्ती ठेवावी. घुबडावर बसलेली देवी लक्ष्मीची प्रतिमा घरी आणू नये.
देवी लक्ष्मीचे वाहन घुबड असतं मात्र घुबडावर विराजमान असलेली देवीची प्रतिमा घरात आणि नये. कारण वाहनावर बसून देवी लक्ष्मी चालत असते आणि घरात स्थिर राहत नाही असं याकरिता होत कारण घुबड चंचल असतं आणि कधीच एका स्थानावर थांबत नाही. तसेच देवी लक्ष्मीची मूर्ती भिंतीपासून दूर ठेवावी.
अनेकजण भिंतीला टेकवून देवीची स्थापना करतात मात्र त्यात अंतर असणे आवश्यक आहे कारण त्यात वास्तूदोषाचा संबंध असतो. देवीच्या प्रतिमेचे मुख नेहमी उत्तरेला असावे हे शुभ असते. घरात देवी लक्ष्मीचे एकाहून अधिक मूर्ती ठेवू नये. असे केल्याने देवीची कृपा होत नाही. वरील लहान लहान महत्वाच्या गोष्टीकडे देवीची स्थापना करताना अवश्य लक्ष द्यावे.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.