प्रत्येक धर्मात झाड, वृक्ष, रोपं याचं महत्त्व असतं. परंतु मनुष्य याकडे मुळीच लक्ष न देता दिवसेंदिवस वृक्षांची कापणी सुरुच आहे. या कृत्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडत असून जीवनात संकट वाढत आहे. पृथ्वीवर ऑक्सिजनचं निर्माण करणार्या वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. झाडं नसतील तर एक दिवस वायू नसणार मग निश्चितच मानव नसणार. चला झाडाचे 20 रहस्य जाणून घेऊया
धर्मग्रंथानुसार जो मनुष्य एक पिंपळ, एक कडुलिंब, दहा चिंच, तीन कॅथ, तीन बेल, तीन आवळा आणि पाच आंब्याची झाडे लावतो तो संत आहे आणि त्याला नरक कधीही भोगावं लागणार नाही. त्याचप्रमाणे शास्त्रात वृक्षांसह निसर्गाच्या सर्व घटकांचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली आहे.
भारतीय धर्माप्रमाणे निसर्ग हा देवाचा पहिला प्रतिनिधी आहे. निसर्गाचे सर्व घटक देवाच्या अस्तित्वाचा अहवाल देतात. म्हणूनच निसर्गाला देवता, देव आणि पिता मानले जाते. येथे प्रत्येक देवी आणि देवता वृक्ष, प्राणी किंवा पक्षी यांच्याशी संबंधित आहेत. ग्रह आणि नक्षत्र देखील जोडलेले आहे. धर्माप्रमाणे दूरस्थ स्थिति ध्रुव तारा देखील आमचं जीवन संचालित करत आहे. मग हिमालयाच्या ग्लेशियर व चंद्राबद्दल काय म्हणावे. संपूर्ण ब्रह्मांड एकमेकाशी जुळलेलं आहे. एक तार जरी खंडित झाला तरं सर्व काही विस्कटून जाईल. हे विश्व एक उलट झाडासारखे आहे.
धर्मानुसार यज्ञाचे पाच प्रकार आहेत, त्यापैकी देवयज्ञ आणि विश्वदेवयज्ञ हे दोन यज्ञ निसर्गाला वाहिलेले आहेत. दोन्ही प्रकारच्या यज्ञांचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व आहे. देवयज्ञाने हवामान आणि वातावरण सुधारते तर वैश्वदेवयज्ञ निसर्ग आणि प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. सर्व प्राणी आणि झाडे यांच्याबद्दल करुणा आणि कर्तव्य समजणे, त्यांना अन्न-पाणी देणे यालाच भूतयज्ञ किंवा वैश्वदेव यज्ञ असे म्हणतात.
हिंदू धर्माच्या अनुसार, झाडाला देखील आत्मा असते. वृक्ष संवेदनशील असतात व त्यांच्या शक्तीशाली भाव या माध्यामातून आपलं जीवन बदलू शकतात. प्रत्येक झाडाचे सखोल विश्लेषण करून आमच्या ऋषींनी हे शोधले की पिंपळ आणि वडाची झाडे काहीतरी खास आणि वेगळी आहेत. ही पृथ्वीवर असल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होतं. हे सर्व जाणून घेतल्यावर त्यांनी या वृक्षांच्या संरक्षणासाठी आणि मानवांच्या हितासाठी काही कायदे बनवले आहेत, त्यातील दोन म्हणजे पूजा आणि परिक्रमा आहेत.
स्कन्द पुराणात वर्णित पिंपळाच्या वृक्षात सर्व देवतांचा वास असतो. पिंपळाच्या सावलीत ऑक्सिजनने भरपूर आरोग्यवर्धक वातावरण निर्मित होतं. या वातावरणापासून वात, पित्त आणि कफाचे प्रमाण कमी केले जाते आणि तिन्ही स्थितींचे संतुलनही राखले जाते. याने मानसिक शांती प्राप्त होते. प्राचीन काळापासून पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचं विधान आहे.
अथर्ववेदाच्या उपवेद आयुर्वेदात पिंपळाच्या औषधी गुणधर्मांचा का उपयोग अनेक असाध्य आजरांवर उपचार म्हणून केल्याचे वर्णित आहे. औषधी गुणधर्मांमुळे, पिंपळाला ‘कल्पवृक्ष’ असे म्हटले गेले आहे. पिंपळाच्या मुळापासून ते पानांपर्यंत तेहतीस कोटि देवतांचा वास असल्यामुळे हे झाड पूजनीय आहे. या झाडाला जल अर्पित केल्याने सर्व आजार व शोक नाहीसे होतात. गीता मध्ये भगवान कृष्ण म्हणतात की, ‘हे पार्थ झाडांमध्ये मी पिंपळ आहे’ अश्वत्थोपनयन व्रताच्या संदर्भात महर्षी शौनक म्हणतात की मंगळ मुहूर्तात पिंपळाच्या झाडाच्या नियमित तीन प्रदक्षिणा घातल्याने व जल अर्पित केल्याने दारिद्रय, दु:ख व दुर्भाग्याचा नाश होतो. पिंपळाच्या दर्शन व पूजनाने दीर्घायु व समृद्धी प्राप्त होते. अश्वत्थ व्रत अनुष्ठान केल्याने कन्येला अखण्ड सौभाग्य प्राप्ती होते. रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड लावल्याने व त्याचा सांभाळ केल्याने देवलोक प्राप्ती होते. पिंपळाच्या रोपण करणार्याला या लोकात किर्ती प्राप्त होते व मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते.
जो माणूस आपल्या घरात फळझाडे, झाडे इत्यादींची लागवड करतो व त्याची चांगली काळजी घेतो, त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
5 वडाची झाडे लावून त्यांची काळजी घेणार्यांच्या सात पिढ्या पुण्याचा लाभ घेतात. जी व्यक्ती जितक्या कुडुलिंबाची झाडे लावतात त्यांच्या तेवढ्या पिढ्या पुण्याई कमावतात.
वृक्ष किंवा बाग लावणार्यांना कीर्ती प्राप्त होते.
महादेवाच्या मंदिरात बिल्व वृक्ष रोपण करणारा अकाला मृत्यूपासून मुक्त होतो.
घरात तुळस, आवळा, निर्गुण्डी, अशोक, इतर वृक्ष लावणे फलदायी असतात. रस्त्यावर रोझवुडचे 11 वृक्ष लावल्याने दोन्ही लोकात त्रास सहन करावा लागत नाही.