नुकताच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत होती. आता मिलिंद नंतर याच मालिकेतील नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवणारी संजना म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसलेने देखील एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या रूपालीच्या पोस्टने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रूपालीने हिंदीतील काही मालिका त्यानंतर बिग बॉस मराठी आणि आता आई कुठे काय करते
या मालिकेमधून उत्तम कामगिरी करून प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. तर रुपाली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते तिचे व्हिडिओ आणि फोटोज ती नेहमी शेअर करत असते. सोशल मीडियावर देखील रूपालीचा मोठा चाहता वर्ग आहे. रूपाली भोसले म्हणजेच संजना काही काळापासून मालिकेतून गायब दिसत आहे. आता तिच्या या गायब होण्यामागचे कारण तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
रूपालीची सध्या एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली असून ती रुग्णालयात दाखल झाली आहे. इंस्टाग्रामवर तिने तिच्या उपचारादरम्यानचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. फोटो शेअर करत तिने लक्षवेधी कॅप्शन देखील दिले आणि यामध्ये तिने एक महत्त्वाचा सल्ला देखील चाहत्यांना दिला आहे. रूपाली ने फोटो शेअर करत म्हटले की, “कधीकधी दुसऱ्यांची काळजी घेण्यात आपण इतके व्यस्त होतो की स्वतःकडे दुर्लक्ष करत जातो.
झाड जितके निरोगी आहे तितके चांगले फळ देऊ शकते. यामुळे आधी स्वतःकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या जीवनात कधी कधी कल्पने पलीकडील गोष्टींना तोंड देण्याची वेळ देखील येऊ शकते. अशा वेळी देखील आपण स्वतःला फक्त आनंदी ठेवत त्या गोष्टीला हसत सामोरे जाणे गरजेचे असते #आयुष्य सुंदर आहे”. पुढे तिने तिच्या तब्येतीविषयी सांगत म्हटले की, “काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडली.
मात्र आता मी बरी आहे. हळूहळू माझ्या तब्येतीत फरक दिसून येत आहे. तुम्ही सगळ्यांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीरात जे काही घडत आहे याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि हे दुखणे जोपर्यंत जीव घेणे होत नाही तोपर्यंत आपण याकडे दुर्लक्ष करत असतो.
पण मी सर्वांना गंभीरपणे विनंती करते की आपल्या स्वास्थ्याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका काही होत असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा भेटा.
तुम्ही तुमच्या शरीराला आणि स्वतःला गृहीत धरू नका”. असा मोलाचा सल्ला तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्ट वरून दिला आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि नर्सेसचे देखील आभार मानले. सध्या रूपालीच्या या पोस्टमुळे तिचे चाहते काळजीत दिसत आहेत. तर तिला लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देखील देत आहेत. तिने केलेल्या पोस्टवर तिचे सहकलाकार देखील कमेंट करून तिला धीर देत आहेत तसेच तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद