सध्या जगातील सर्व फुटबॉलप्रेमींचं लक्ष कतार इथं सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल २०२२ कडे लागलं आहे. विश्वचषक स्पर्धेतील बातम्या आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. आता देखील जपान विरुद्ध जर्मनी यांच्यातील सामन्या नंतरचा एक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहेत. या व्हिडिओ आणि फोटोंमुळे जपानी लोकांचं आणि त्यांच्या स्वभावाचं वारेमाप कौतुक केलं जात आहे.
त्यातील एक फोटो प्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले यांनी त्यांच्या सोशल मीडिया शेअर केला आहे. त्याबरोबर वैभव यांनी एक विचार करायला लावणारी पोस्ट शेअर केली आहे. सिनेमा, मालिका आणि नाटकात केलेल्या सहजसुंदर अभिनयानं वैभव मांगले यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच वैभव हे सुंदर चित्र काढतात.
सोशल मीडियावर त्यांनी काढलेले चित्रांचे फोटो ते शेअर करत असतात. तसंच चालूघडामोडींवर भाष्य करणाऱ्या पोस्टही ते शेअर करत असतात. आता देखील त्यांनी फिफा २०२२ मध्ये जर्मनी विरुद्ध जपानच्या सामन्यानंतरचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी काही स्तुत्य विचार मांडले आहेत. वैभव यांच्या याच पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
वैभव यांनी जर्मनी विरुद्ध जपान सामन्यानंतरच्या स्टेडिअमवरील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमधून सर्व जगाला एक संदेश देण्यात आला आहे. हाच फोटो शेअर करत वैभव यांनी लिहिलं आहे की, जर्मनी विरुद्धचा फुटबॉलचा सामना जपानने जिंकला. सामना संपल्यावर, सर्व लोक बाहेर पडल्यानंतर जपानच्या काही प्रेक्षकांनी तिथे झालेला कचरा साफ केला..
आपल्याकडे असं करणाऱ्यालाच अक्कल शिकवतील… आणि खुळ्यात काढतील… आलाय मोठा असंही ऐकवतात… मागे एकदा एका कारवाल्याने सिग्नलला प्लास्टिक बाटली टाकली… तर मी त्याला ती परत दिली तर ‘तुला काय प्रॉब्लेम आहे रे’ म्हणून त्याने पुन्हा बाहेर टाकली… ती मी नंतर कचरा कुंडीत टाकली… मानसिकता बदलल्याशिवाय समाज बदलत नाही पर्यायाने देश बदलत नाही.
वैभव यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांची मतं देखील कॉमेन्टमध्ये मांडली आहेत. एका युजरनं लिहिलं आहे की, ‘अचूक पकडले, आपल्याकडे नियम व शिस्त पाळणाऱ्याला परग्रहवासी असे बघितले जाते. त्यामुळे तोही पुन्हा नियमपालन करण्यापूर्वी विचार करतो… मी जमेल तिथे नियम पालन करणाऱ्याचे कौतुक करतो…’
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद