प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळेच्या चित्रपटातील आणखी एका अभिनेत्याला पोलिसांनी नुकताच अटक केली आहे त्याच्यावर अतिशय गंभीर असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत नागपूरच्या प्रियांशु रवी क्षत्रिय याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे प्रियांशुने नागराज मंजुळे यांच्या झुंड या सिनेमात काम केले होते या सिनेमासाठी नागराजने तळागाळातील कलाकारांना शोधले होते
आणि त्यातीलच एक म्हणजे प्रियांशु तर असे घडले आहे की काही दिवसांपूर्वी नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी मधील प्रवीण मुडावे याच्या घरी चोरी झाली त्यावेळी चोरट्यांनी रोख रकमेसह किमान 75 हजारांचे दागिने लंपास केले होते यावेळी पोलिसांनी एका अल्पवयीनासह दोघांना अटक केली होती चौकशी दरम्यान या घर फोडीत प्रियांशूचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले
पोलीस मागावर असल्याचे पाहून प्रियांशू काही काळ फरार झाला होता मात्र तो गत्ती गोदा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली त्याला 25 नोव्हेंबर पर्यंत कोठडी सुनवण्यात आली आहे प्रियांशुने दिलेल्या माहितीनुसार गत्ती गोदा मधील कबुतरांच्या पेटीत लपवलेले दाग दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत
तर चौकशीत आणखी काही घर फोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे काहीच दिवसांपूर्वी प्रियांशु गांजा पिताना सुद्धा आढळला होता त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे तर काहीच दिवसांपूर्वी नागराजच्या सैराट या चित्रपटातील प्रिन्स म्हणजेच अभिनेता सुरज पवार वर देखील गुन्हा दाखल झाला होता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद