चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे कारण प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे अशा बातम्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत पण हे खरं आहे की खोटं हे जाणून घेण्याआधीच अनेक प्रेक्षक विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहत आहेत पण आता विक्रम गोखले यांच्या पत्नीने याबद्दलची माहिती दिली आहे
चला तर जाणून घेऊया की काय आहे संपूर्ण माहिती तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आल्यापासून अनेकांनी त्यांच्या प्रकृती विषयी काळजी व्यक्त केली आहे अशातच रात्री उशिरा विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला असे वृत्तही व्हायरल झाले पण विक्रम गोखले यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे
पण त्यांच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात आलेली आहे ए टाइमच्या रिपोर्टर्स नुसार विक्रम गोखले यांच्या पत्नीने हेल्थ अपडेट देताना त्यांना त्रास होत आहे मागील काही दिवसापासून त्यांचे अवयव निकामी होत आहेत काल रात्रीपासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाही
डॉक्टर गुरुवारी सकाळी पुढील निर्णय घेणार आहेत दरम्यान विक्रम गोखले हे कोमामध्ये असून व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर आहेत 5 नोव्हेंबर पासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत 77 वर्षीय विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवत आहेत विक्रम गोखले यांच्यासोबत त्यांची पत्नी ऋशाली व दोन्ही मुली आहेत
लॉकडाऊनच्या काळामध्ये विक्रम गोखले पुण्यामधून मुंबईमध्ये शिफ्ट झाले काही दिवसांपूर्वी ते स्टार प्रवाह वरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकले होते मराठी नाटक सिनेमा यांबरोबरच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी अनेक भूमिका केल्या आहेत हम दिल दे चुके सनम भूल भुलैया यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे
मराठी सिनेमांमध्ये गोदावरी नटसम्राट यांसारख्या चित्रपटात झळकले गोदावरी हा त्यांचा मागील आठवड्यात रिलीज झालेला सिनेमा आहे काल रात्री विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल होताच अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पण अद्यापही ते मृत्यूशी झगडत आहेत जर तुमच्याकडे अशी कोणती बातमी आली असेल तर त्याच्यावर कृपया विश्वास ठेवू नका
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद