देव माणूस मालिका आता संपलेली आहे परंतु या मालिकेचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल तर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर बघता बघता सर्वांची इच्छा पूर्ण झाली ती म्हणजे डॉक्टर अजितला फाशीची शिक्षा मिळाली आणि इथेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला
तर गेल्या काही दिवसांपासून देव माणूस ही मालिका बंद होणार अशी चर्चा सुरू होती अखेर आता मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड्स तोडले इतकंच नाही तर प्रेक्षकांच प्रेम ही मिळवलं खरंतर मालिकेच्या कथानकावरून प्रेक्षकांमध्ये नाराजी होती पण कलाकारावरच्या प्रेमामुळे ही मालिका बंद करू नका
अशी मागणी प्रेक्षक करत होते पण आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय किरण गायकवाडने याबद्दलची माहिती देत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे किरण गायकवाड असे म्हणतो की शेवटी ती वेळ आली निरोपाची आज देव माणूस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार उद्यापासून आमची टीम तुमचं मनोरंजन करायला तुमच्यासमोर नसेल
काल गणपती गेले जाताना आपल्याबरोबर देवीसिंग एक डॉक्टर देव माणूस नकारात्मक माणसं सोबत घेऊन गेले खरं तर ती आपल्या आजूबाजूला असतात गोड बोलून आपल्याला त्यांच्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत असतात अशा बुरख्या आड लपलेल्या माणसांचा बुरखा समाजासमोर आणावा तो फाडावा असा आमचा मानस होता
अशी वेडी माणसं आपल्या आजूबाजूला असतीलच तर आपण वेळीच सावध होऊया मालिका संपत असताना बऱ्याच प्रेक्षकांचे फोन मेसेज येत आहेत की आम्हाला देव माणसाचा खूप राग येतो त्याला आम्ही खूप शिव्याही घालतो पण ही मालिका बंद करू नका मालिका संपताना सुद्धा प्रेक्षकांचे एवढं प्रेम पाहून भारावून जायला आलं डॉक्टरला फाशी झाली
त्याच्या तोंडाला काळ फासून धिंड काढण्यात आली त्याची किरडी ढासळली याआधी या महाराष्ट्राच्या इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या असं म्हणत किरणने अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की देव माणूस तीन येणार का तर मालिका संपली असली तरीही या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे
पण किरणच्या या पोस्टवरून आता देवमाणूसचा तिसरा सिझन येणार नाही हे स्पष्टच झाले आहे परंतु आता या मालिकेचे लेखक हे काहीही करू शकतात पण आता डिंपलच्या पोटात ते देवमाणसाचं जे बाळ आहे ते जेव्हा जन्माला येईल तेव्हा या मालिकेचा तिसरा भाग नक्कीच येऊ शकतो
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते
तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद