आपल्याला मंगेशकर कुटुंबीय विषयी नेहमीच उत्सुकता असते भारताच्या संगीत क्षेत्रात अविट ठसा उमटविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची महातीच इतकी मोठी आहे की त्यांच्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला माहिती असणे नेहमीच महत्त्वाचं वाटतं रविवार गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले मात्र लता मंगेशकरानंतर त्यांच्या कुटुंबात कोणकोण सदस्य आहेत याविषयी जाणून घेऊया मंगेशकर कुटुंबीयात सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे तेजस्वी बल्लेदार धारदार आवाज आणि उत्तम अभिनयाची देणगी
असलेल्या दिनानाथ मंगेशकरांना मास्टर ही उपाधी प्राप्त झाली होती मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी दोन लग्न केली त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होत नर्मदा मंगेशकर त्यांना एक मुलगी होती तीच नाव होत लतिका मंगेशकर मात्र आजारपणामुळे फार कमी वयातच नर्मदा मंगेशकर आणि लहान लतिका मंगेशकर यांचे निधन झाले यानंतर मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनी नर्मदा मंगेशकरांची सख्खी बहीण शेवंती यांच्याशी लग्न केले यांना नंतर सगळे माई मंगेशकर म्हणून ओळखतात मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि माईंना एकूण पाच मुले झाली
यात सर्वात थोरल्या होत्या लता मंगेशकर त्यांनतर मीना खडीकर मंगेशकर तिसऱ्या आशा भोसले चौथ्या उषा मंगेशकर आणि सर्वात धाकटी भाऊ हृदयनाथ मंगेशकर यात गानकोकिळा लता मंगेशकर या अविवाहित राहिल्या यानंतर मीना खडिकर मंगेशकर यांचा विवाह झाला यांची ओळख म्हणजे त्याही उत्तम गायिका आणि संगीतकार आहेत मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत मदर इंडिया या गाजलेल्या चित्रपटातील दुनिया में हम आये है तो जिना ही पडेगा हे संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले गाणं
लता दीदी बरोबर मीना यांनीही गायले होते मीना मंगेशकर या लग्नानंतर मीना खडीकर झाल्या त्यांना योगेश खडीकर आणि रचना शहा खडीकर अशी दोन मुले आहेत तिसऱ्या मंगेशकर म्हणजे आशा भोसले लता दीदी बरोबरच आशा ताईंचा आवाजही तितकाच जादुई आशा मंगेशकर यांचे लग्नानंतर नाव आशा भोसले झालं आशा भोसलेंना एकूण तीन मुले सर्वात मोठा मुलगा आनंद भोसले यांची रेस्टॉरंटची चेन आहे दुसरा मुलगा हेमंत भोसले यांचं आजारपणामुळे दुर्देवी निधन झाले तर सर्वात लहान मुलगी वर्षा भोसले यांचही काही वर्षापूर्वीच निधन
झालं आहे यामुळे आशा भोसले नंतर त्यांच्या पश्चात आनंद भोसले हे एकमेव आहेत मुंगळा छबिदार छबी तोऱ्यात उभी अशा एकशे एक हिट गाणी गाणाऱ्या उषा मंगेशकर यांचा चौथा नंबर लागतो लता मंगेशकर प्रमाणेच उषाही अविवाहित आहेत यानंतर सर्वात धाकटे बंधू म्हणजे प्रख्यात गायक आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर लता दीदी त्यांना लाडाने बाळ अशी हाक मारायच्या हृदयनाथ मंगेशकर यांनी अभिनेत्री भारती मालवणकर यांच्याशी विवाह केला भारती मालवणकर या ज्येष्ठ विनोदी अभिनेते दामू अण्णा मालवणकर यांची कन्या या
दोघांना तीन मुले आहेत गायक आणि मंगेशकर कुटुंबीयांचा पुढच्या पिढीतील महत्त्वाचा सदस्य म्हणजे आदिनाथ मंगेशकर रविवारी लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी आदिनाथ मंगेशकर सर्व कुटुंबीयांना आधार देताना दिसत होते दुसरा मुलगा म्हणजे वैजनाथ मंगेशकर हा एक उत्तम गायक आहे सर्वात धाकटी मुलगी म्हणजे राधा मंगेशकर ही पण एक उत्तम गायिका आहे आपल्या वडिलांसोबत राधा भाव सरगम हा कार्यक्रम ही रसिकांसमोर सादर करीत असते ही आहे संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांची माहिती आपण दरवेळी नेहमी
पाचही मंगेशकर भावंडांचा अगदी प्रसन्न फोटो पाहत असतो मात्र रविवारी स्वर सम्राज्ञी लता मंगेशकरांचे निधन झाल्याने या भावंडांचा असा एकत्रित क्षण पुन्हा दिसणार नाही आता लता दीदींच्या राहिल्या फक्त गोड आठवणी आणि त्यांचा दैवी आवाज आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद