सध्या लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे मालिकांचं शूटिंग बंद आहे म्हणूनच कलर्स मराठीवर बिग बॉस सिझन २ परत एकदा दाखवण्यात येत आहे बिग बॉस मध्ये सर्वात शांत अशी अभिनेत्री सर्वानाच आवडली ती म्हणजे किशोरी शहाणे तर याच किशोरी शहाणेच लग्न कोणाबरोबर झाले आहे प्रेमविवाह की अरेंज मॅरेज आहे हे जाणून घेणार आहोत किशोरी शहाणे यांची लव्हस्टोरी २३ एप्रिल किशोरी शहाणे यांचा वाढदिवस आहे किशोरी शहाणे यांनी आपल्या मनमोहक अदांनी अगदी पूर्वीपासूनच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे किशोरी शहाणे यांनी पूर्वी खूप प्रसिद्ध
चित्रपटामध्ये काम केले आहे त्यापैकी काही चित्रपट आयत्या घरात घरोबा माझा पती करोडपती बाळाचे बाप ब्रम्हचारी यासारखी चित्रपट गाजवलेली ही एक गुणी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी बिग बॉस सिझन २ मध्ये असताना त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल सांगितले होते किशोरी शहाणे यांचा प्रेमविवाह झाला आहे दोन विविध भाषांतील या व्यक्ती एकत्र आल्या आणि त्यांच्यात प्रेम झालं त्यांच्या पतीचे नाव दीपक बलराज विर असे आहे ते एक प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत दीपक हे पंजाबी आहेत तर किशोरी महाराष्ट्रीयन मराठी फॅमिलीतील आहे
या दोन भिन्न प्रांतातील भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र कशा आल्या याबद्दल जाणून घेऊया किशोरी शहाणे सांगतात दीपक आणि किशोरी यांच्या मैत्रीला एक मित्र कारणीभूत आहे तो म्हणजे जॅकी श्रॉफ जॅकी श्रॉफ आणि किशोरी यांची चांगली मैत्री होती जॅकी श्रॉफ यांनी किशोरी यांना सांगितले की माझा एक मित्र आहे जो डिरेक्टर आहे आणि त्याला एक मराठी ॲक्ट्रेस पाहिजे आहे चित्रपटासाठी तर त्यासाठी मी तुझे नाव सुचवतो आणि ओळखही करून देतो आणि सांगितल्याप्रमाणे किशोरी शहाणे आणि दीपक यांची ओळख करून दिली दीपक यांनी किशोरी
शहाणे यांना हफ्ता बंद या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली किशोरी शहाणे यांचा हा पहिला हिंदी चित्रपट होता यामध्ये त्यांनी खूप सुंदर रोल साकार केला आणि त्यांना खूप प्रचंड लोकप्रियता मिळाली पण या चित्रपटाच्या माध्यमातून दीपक आणि किशोरी यांच्यात चांगली मैत्री झाली त्यांची ओळख वाढू लागली आणि ते वारंवार भेटू लागले दीपक आणि किशोरी यांच्या घरच्यांचीही खूप चांगली मैत्री झाली दोन तीन वर्ष ते भेटू लागले आणि या वर्षामध्येच या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले पण हे कधी झालं हे दोघांनाही कळले नाही ते नेहमी रात्ररातभर छपून
एकमेकांशी फोनवर बोलत असत या सगळ्यानंतर किशोरी शहाणे यांना वाटले की आपण लग्न केले पाहिजे पण दोघंही एकमेकांना विचारण्यासाठी घाबरत होते आणि कोण पुढाकार घेणार हाच प्रश्न होता पण ती वेळ आलीच आणि किशोरी शहाणे यांनीच पुढाकार घेतला आणि दीपक यांना लग्नासाठी मागणी घातली आणि सांगितले की आपण लग्न करूया त्या दोघांनी मनात ठरवले होते पण घरच्यांची परवानगी घेणं बाकी होत दीपक आणि किशोरी शहाणे यांनी घरच्याना कळवले सुरुवातीला थोडा विरोध झाला
पण थोड्याच दिवसानंतर हा विरोध मावळला आणि या दोघांचं लग्नही झालं हे दोघेही गुणी कलाकार आहेत या दोघांना एक बॉबी नावाचा मुलगाही आहे किशोरी शहाणे पुन्हा एकदा चर्चेत आल्या ते म्हणजे बिग बॉस मराठी सिझन २ मुळे बिग बॉस मध्येही त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद