या तारखेला होणार नागराज मंजुळे यांचा झुंड प्रदर्शित

मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित केलेला बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेला झुंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार अशी नेहमीच चर्चा व्हायची या सिनेमाचा रीझर प्रेक्षकांना बघायला मिळाला होता मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकला नाही लॉकडाऊन कोरोना या सगळ्या कारणांमुळे हा चित्रपट नेहमी पुढे ढकलला जायचा पण सध्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाची

तारीख जाहीर केली आहे येत्या ४ मार्चला झुंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चित्रपट बनून तयार आहे आणि या दरम्यान झुंड हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यातही अडकला होता पण आता मात्र झुंड हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे झुंड हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल शिक्षकाच्या जीवनावर आधारीत आहे विजय बारसे यांनी गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉलची टीम बनवली होती झुंड

सिनेमात अमिताभ बच्चन यांनी फुटबॉल शिकवणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे याआधी हा चित्रपट १८ जून ला प्रदर्शित होत असल्याचे सांगितले गेले होते पण आता मात्र ४ मार्च २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *