अलका कुबल यांच्या मुलीच्या लग्नानंतर अभिनेता मिलिंद गवळी म्हणाले

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी ईशानी यांचे निशांत वालीया सोबत लग्न झाले या लग्नासाठी अनेक मराठी कलाकार हजर होते यामध्ये स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अनिरुद्ध ची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हेसुद्धा या लग्नामध्ये उपस्थित होते अभिनेता मिलिंद गवळी आणि अलका कुबल हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत

त्यामुळे अलका कुबल यांनी त्यांच्या मुलींना कसे मोठे केले म्हणजेच अलका कुबल यांचा जीवन प्रवास हा अभिनेता मिलिंद गवळी यांना ठाऊक आहे म्हणूनच या लग्नानंतर अभिनेता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत अलका कुबल आणि त्यांच्या मुलींबद्दल म्हटले आहे की माणसाच्या आयुष्यात किंवा जीव की प्राण काय असेल तर ती असते लेक लेकी अशा पटकन मोठ्या होतात

एक राजकुमार येतो दोघेही उंच भरारी घेतात आपण आनंदाने त्यांचे उडणे पाहत राहायचं समीर आठल्ये आणि अलका ताईंची लेक ईशानी ही खरच एक पायलेट आहे आणि तिचा विवाह ज्याच्याशी झाला तो सुद्धा पायलेटच आहे म्हणजे खरंच ते आकाशात उंच भरारी घेतात ईशानी परदेशात विमानाचं प्रशिक्षण घेण्यासाठी निघाली होती तेव्हा मी तिला म्हणालो होतो एक दिवस तु जे विमान चालवतस त्या विमानात मला प्रवास करायचा आहे

माझ्या काही स्वप्नात पैकी ते एक स्वप्न आहे लेकी जेव्हा अशा भरारी घेतात यशस्वी होतात तेव्हा त्यामागे आई-वडिलांचे खूप परिश्रम असतात आईचे थोडे जास्तच मी आणि अलकाताई गेले वीस वर्षे एकत्र सिनेमांमध्ये काम करत आहोत आमचे प्रोफेशनल रिलेशन तर आहेतच पण त्यापेक्षाही फॅमिली रिलेशन जास्त ईशानी आणि कस्तुरीला मी त्यांच्या लहानपणापासून ओळखतो

अलका ताई आणि समीर ने त्यांच्यावर जे काही संस्कार केले आहेत ते मी अनेक वर्षांपासून जवळून पाहात आलो आहे आपण आदर्श ठेवावा असे हे दांपत्य आहेत दोघेही नवरा-बायको कर्तुत्वाने खूप मोठे आहेत पण माणूस म्हणून ते महान आहेत अनेक कुटुंबांना त्यांनी वर्षानुवर्षे सांभाळले आहेत अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करून सुद्धा ते कधीही फिल्मी झाले नाहीत

कामानिमित्त दोघांनाही सतत महाराष्ट्रभर फिरावे लागत होतं पण एक घार जशी आकाशातून आपल्या पिल्लांवर नजर ठेवत असते तसेच समीराने आणि अलकाताई ने पोरींकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांना घडवलं अलका ताईंचे एक उदाहरण मी कधीच माझ्या जन्मात विसरणार नाही नागपूरला मराठा बटालियन या सिनेमाच्या शूटिंगवेळी त्या ईशानी आणि कस्तुरीला घेऊन आल्या होत्या

या चित्रपटाचा समीर कॅमेरामन होता मुली लहान होत्या शूटिंग संपवून आम्ही एअरपोर्टला जात होतो अलकाताई नी गाडी वळवायला सांगितले ज्या गेस्ट हाउस मध्ये आम्ही उतरलो होतो त्या गेस्टहाऊस मध्ये परत घ्यायला सांगितलं माझं महत्त्वाचं काम राहिले जावंच लागेल गेस्ट हाऊस वर अलका ताईंनी पटकन पन्नास शंभर रुपये काढून प्रॉडक्शन वाल्याला दिले मी विचारलं तेवढ्यासाठी आपण का परत आलो

अलका ताईंचे उत्तर ऐकून मी थक्क झालो ताई म्हणाल्या सकाळी दूध मागवलं होतं मुलींसाठी त्याचे पैसे द्यायचे राहून गेले होते मी म्हणालो त्यात काय एवढं अलकाताई म्हणाल्या कोणी म्हणायला नको आलका ताईंच्या मुलींच्या दुधाचे पैसे आम्ही दिले म्हणून ईशानी आणि निशांत खूप खूप आशीर्वाद अशाप्रकारे अलकाताई यांनी त्यांच्या दोन लहान मुलींना कशाप्रकारे मोठं केलं याबद्दलची माहिती अभिनेते मिलिंद गवळी यांनी दिली आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *