मुलगी झाली हो चा वाद मिटणार मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मध्यस्थी

मुलगी झाली हो या स्टार प्रवाह वरील मालिकेतील किरण माने यांना काढल्यामुळे सुरू असलेला वाद आता मिटण्याची शक्यता आहेत आणि अभिनेते किरण माने हे विलास पाटील यांच्या भूमिकेत पुन्हा एकदा मालिकेमध्ये दिसण्याची शक्यता आहे कारण हा वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्थी केली

नुकताच हा वाद मिटवण्यासाठी स्टार प्रवाह हेड सतीश राजवाडे अमोल कोल्हे आणि अभिनेते किरण माने हे जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये हजर होते यामध्ये अमोल कोल्हे स्टार प्रवाह हाऊसचे आणि प्रॉडक्शन हाऊसची बाजू मांडन्यासाठी तेथे आले होते असे अभिनंदन किरण माने यांनी म्हटले आहे तेथे अभिनेत्री किरण माने यांनी स्वतःची बाजू मांडली

सतीश राजवाडे यांनी देखील चैनल ची बाजू मांडली आणि आता पुढील बैठक ही मुलगी झाली हो या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सदस्यांसोबत होणार आहे यामध्ये सर्वजण समोर बसून हा वाद मिटवावा असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे तसेच किरण माने यांच्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका चैनल घ्यावी असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे

तसेच स्टार प्रवाह हेड सतीश राजवाडे यांनी या प्रकरणाची जास्त माहिती नसल्याचे सांगितले आहे म्हणजेच किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढण्याचा निर्णय हा स्टार प्रवाह चॅनेल चा नसून प्रॉडक्‍शन हाऊसचा आहे त्यामुळे पुढील बैठक ही प्रोडक्शन हाऊस मधील माणसांसोबत होणार आहे पुढील बैठकीमध्ये अभिनेते किरण माने मुलगी झाली हो या मालिकेत पुन्हा झळकतील का नाही

यासंबंधी महत्त्वाचा निर्णय होईल जर हा निर्णय किरण माने यांच्या बाजूने आला तर ते पुन्हा एकदा मुलगी झाली व या मालिकेत विलास पाटील या भूमिकेमध्ये दिसतील पण हा निर्णय अभिनेते किरण माने यांच्या विरोधात असलेल्या साजरी आणि उमा हे पात्र साकारणारा म्हणजेच दिव्या सुभाश पुगावकर आणि श्रावणी पीले या दोघांना मान्य होईल का हा देखील प्रश्‍न आहेच

कारण या दोन्ही अभिनेत्री किरण माने यांच्या विरोधात आहेत यांनीच किरण मानेवर गैरवर्तनाचा आरोप घातला आहे तर हा वाद पुढील बैठकीमध्ये स्पष्ट होईल या सर्वांबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *