छोट्या पडद्यावर सुरू झालेल्या देवमाणूस २ या मालिकेतल्या घडामोडींबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. दुसऱ्या पर्वात डॉक्टरनं नटवर हे सोंग धारण केलं आहे. या डॉक्टरनं त्याच्या स्वभावानुसार आता नवी सावजं हेरायला सुरुवात केली आहे. गावात आलेल्या कंत्राटदाराच्या बायकोवर नटवरची नजर पडली आहे.
पण पुन्हा तेच ते घडत असल्यानं मालिकेत नवीन काही नाहीए , असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या सीझननं टीआरपीचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. पहिला सीझन संपल्यानंतर मालिकेत काही वेगळं पाहायला मिळणार का? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती.
पण प्रेक्षकांचा हिरमोड झाल्याचं दिसून येत आहे. अशा प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटत आहे. मालिकेतील पात्रांचा अभिनय हा पहिल्या सीझनपेक्षा नाटकी वाटत आहे. नवीन पात्रांचा अभिनय चांगला असला तरी, कथा पुढे जात नसल्याही प्रेक्षकांचं मत आहे.
या मालिकेचे मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दुसऱ्या भागाची प्रेक्षकांनी खिल्ली उडवली आहे. मालिकेचं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर आता दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मालिकेचा मुख्य चेहरा असलेला अभिनेता किरण गायकवाड म्हणजेच
डॉ. अजितकुमार देव हा आता राजस्थानी नटवरच्या भूमिकेत दिसतोय. परंतु हाच देवमाणूस आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालंसुद्धा. नटवर हाच देवमाणूस आहे, हे प्रेक्षकांनी पाहिलंय. पण आता पुढे वेगळं काय पाहायला मिळणार की, हेच पुन्हा दाखवणार असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद