गाजलेल्या हिंदी मालिकांचा रिमेक या मराठी मालिका आहेत

छोट्या पडद्यावरून प्रसारित होणा-या मालिका अनेकदा काल्पनिक घटनांवर आधारित असतात. तर कधी कधी वास्तवातील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखांवर आधारीत असतात. तर कधी कधी इतर भाषांमधील लोकप्रिय मालिका या दुस-या भाषांमध्ये रुपांतरीत करून प्रसारित केल्या जातात. अशाच काही मालिकांवर टाकलेला एक दृष्टीक्षेप.

पिकींचा विजय असो ही नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार आहे. ही मालिका हिंदीमधील निमकी मुखिया या मालिकेवर आधारीत आहे. मराठी मालिकेमध्ये शौर्या सोनावणे ही अभिनेत्री पिंकीची प्रमुख भूमिका साकारत आहे. लग्नाची वाईफ वेडिंगची बायको फेम विजय आंधळकर हा अभिनेता पिंकीचा विजय असो या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. हिंदीमध्ये भूमिका गौरव आणि अभिषेक शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

हिंदी इंडियन आयडलवरून प्रेरित होऊन आता मराठी इंडियन आयडल कार्यक्रम सुरू झाला आहे. हिंदीमध्ये या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया हे आहेत. तर मराठीमध्ये प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून काम करत आहेत.

हिंदीमध्ये पांड्या स्टोर ही मालिका चांगलीच गाजली होती. या हिंदी मालिकेमध्ये किंशुक महाजन आणि शायना दोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मराठीमध्ये ही मालिका सहकुटुंब सहपरिवार या नावाने प्रसारित होत आहे. त्यात सुनील बर्वे, नंदिता पाटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

तेरी लाडली मैं ही हिंदी मालिका खूपच लोकप्रिय आहे. त्यावरून मराठीमध्ये मुलगी झाली हो ही मालिका आली आहे. या मालिकेमध्ये मुलींच्या जन्माचा प्रश्न मांडण्यात आला आहे. हिंदी मालिकेमध्ये अभिनेत्री हेमांगी कवी हिने प्रमुख भूमिका साकारली होती. मराठीमध्ये ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये आघाडीवर आहे. मात्र हिंदी मालिकेला मिळालेला कमी टीआरपी आणि करोनामुळे लागलेला लॉकडाऊन यामुळे तेरी लाडली मैं ही मालिका बंद करण्यात आली.

गुम है किसे के प्यार में ही मालिका हिंदीमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेने हिंदी प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन केले होते. आता ही मलिका मराठीत ‘लग्नाची बेडी’ या नावाने प्रसारित होणार आहे. या मालिकेमध्ये सायली देवधर, रेवती लेले,संकेत पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर हिंदी मालिकेमध्ये आयेशा सिंह, नील भट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *