छोट्या पडद्यावरील देवमाणूस या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या वर्षी या मालिकेच्या पहिल्या पर्वानं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडच्या अभिनयाचंदेखील प्रचंड कौतुक झालं.
या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर प्रेक्षक फार आतुरतेनं दुसऱ्या भागाची वाट पाहात होते. आता ‘देवमाणूस २’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. मालिकेचं नवं पर्वही लोकप्रिय ठरतंय. देवीसिंग नटवर बनून गावात आला आहे.
पण डिम्पलला पूर्ण खात्री आहे की तो देवीसिंग आहे आणि त्यानेच सलोनीचा खून केला आहे. त्यामुळे डिम्पल त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करतेय; पण देवीसिंग तिच्या हाती काही लागू देत नाहीय.
त्या दोघांच्या पुरावे गोळा करण्याच्या या झटापटीमध्ये देवीसिंग डिम्पलचा काटा काढायचं ठरवतो. मालिकेत पुढील आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल।
की देवीसिंग डिम्पलवर जीवघेणा हल्ला करणार आहे. तेव्हा डिम्पल या सगळ्यातून सुखरूप वाचेल की तिचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद