देवमाणूस २ मालिकेवर प्रेक्षक नाराज या कारणामुळे प्रेक्षकांची जोरदार टीका

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस या मालिकेचा दुसरा सिझन सुरू झाला आहे देवमाणूस २ ही मालिका सुरू होताच सुरुवातीचे काही एपिसोड बघून या मालिकेच्या पुढील एपिसोड विषयी खूप उत्सुकता वाढली होती कारण यावेळी मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड हा डॉक्टर अजितच्या नाही तर नटवरच्या भूमिकेत होता त्याचे हे नवीन रूप बघून प्रेक्षकांना वाटले की या सीझनमध्ये काहीतरी वेगळे दाखवणार त्यामुळे

खूप उत्सुकतेने प्रेक्षक ही मालिका बघू लागले पण आता काही एपिसोड बघितल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी या मालिके विषयी नाराजी व्यक्त केली याविषयी प्रेक्षकांनी असे म्हटले आहे की देवमाणूस २ मध्ये देवमाणूस १ प्रमाणे सर्व काही पुन्हा तेच तेच घडत आहे डॉक्टर उर्फ नटवर हा सुध्दा पूर्वीप्रमाणेच दुसऱ्याच्या बायकांना प्रेमात पाडतोय आणि नंतर त्यांचा जीव घेतोय हे सर्व प्रेक्षकांनी अगोदरच्या पार्ट मध्ये बघितले आहे त्यामुळे देवमाणूस २ मध्ये काहीही नवीन नाही

पुन्हा तेच तेच दाखवत आहेत असे म्हणत अनेक प्रेक्षकांनी या मालिकेवर जोरदार टीका केली आहे काही प्रेक्षकांचे या मालिकेचे सध्याचे एपिसोड बघून हिरमोड झाल्याने त्यांनी पुढे ही मालिका फ्लॉप होईल असा अंदाज वर्तवला आहे तर काही प्रेक्षकांनी देवमाणूस २ या मालिकेचे सोशल मीडियावर खिल्ली उडविली देवमाणूस मालिकेचा पहिला सिझन लोकप्रिय झाला खूप यशस्वी झाला

पण आता सुरू झालेल्या देवमाणूस मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांना खूप बोरिंग आणि कंटाळवाणा वाटतोय त्यामुळे या मालिकेचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते हे मालिकेच्या पुढील कहाणीत काही बदल करणार का की पुन्हा देवमाणूस १ प्रमाणेच ही कहाणी पुढे सुरू ठेवणार हे आता पुढील काही एपिसोड बघितल्यानंतर स्पष्ट होईल

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *