सिंधुताई नंतर या प्रसिद्ध कलाकाराचे झाले निधन

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतरच्या दुःखातून महाराष्ट्र सावरत असताना आणखी एक दुखःद वार्ता आली आहे मर्डी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश पिंजाणी चे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे नम्रता संभेराव आवटी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे राजेश पींजाणीच्या अकाली एक्झीट नंतर मराठी

चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांच्या निधनानंतर नम्रता संभेराव आवटी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे आपल्या पोस्टमध्ये लिहलेय की विश्वास बसत नाही सर तुम्ही मला आपल्या नॅशनल अवॉर्ड विनिंग बाबू बँड बाजा फिल्म मध्ये महत्त्वाची भूमिका दिलीत तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील खूप काम करायचं होतं एकत्र आपली भेट पण राहिली

भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावूक पोस्ट नम्रता संभेराव आवटी यांनी त्यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केली आहे राजेश पिंजाणी यांनी बाबू बँड बाजा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातल दुःख मांडलं होतं या चित्रपटात एका बँडवाल्याच आयुष्य नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याच्या आरसाच

आपल्याला पाहायला मिळाला या चित्रपटासाठी त्यांनी तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीला राजेश पींजाणी यांनी शेअर केलेली पोस्ट त्यांची अखेरची सोशल मीडियाची पोस्ट ठरली या पोस्टमध्ये त्यांनी २०२१ ला निरोप देत २०२२ चे स्वागत केले गुड बाय आणि वेलकम असे कॅप्शन असलेली त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *