गेलेली वेळ कधीच परत येत नाही फक्त आठवणीच राहतात! पण काही खास क्षण आपण कॅमेऱ्यात टिपतो. मग जेव्हा जेव्हा ते फोटे समोर येतात तेव्हा तो काळही डोळ्या पुढे उभा राहतो. बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो पाहून लोक तिला ओळखत नाहीत कोण आहे वडिलांच्या मांडीवर बसलेली ही निरागस मुलगी. तुम्हाला एक हिंट देतो ही मुलगी आज एका मोठ्या क्रिकेटरची पत्नी आहे. आणि बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीने सलमान खान शाहरुख खान आणि आमिर खान सोबत काम केले आहे.
ही गोंडस मुलगी दुसरी कोणी नसून अनुष्का शर्मा आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा ने तिच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. चाहत्यांना अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो प्रचंड आवडला आहे. अनुष्का शर्माने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. या अभिनेत्रीने तिन्ही खानसोबत हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत दक्षिण आफ्रिकेत आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अनुष्का शेवटची आनंद एल रायच्या झिरोमध्ये कतरिना कैफ आणि शाहरुख खान सोबत दिसली होती. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही दरम्यान ती निर्माता बनली आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद