या कारणामुळे शाहरुख खानने ऐश्वर्या रायला तब्बल पाच चित्रपटांतून काढलं होतं बाहेर

ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत शाहरुखने तिला पाच चित्रपटांमधून काढल्याचा खुलासा केला होता। बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे। त्यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती।

शाहरुख आणि ऐश्वर्याने ‘देवदास’, ‘मोहब्बतें’ आणि ‘जोश’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते। मात्र, एकवेळ अशी आली होती की त्या दोघांचे पटत नव्हते. त्यानंतर शाहरुखने ऐश्वर्याला चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता।

चलते चलते’ या चित्रपटात ऐश्वर्या आणि शाहरुखची जोडी पहिल्यांदा पाहायला मिळाली होती। त्याचवेळी ऐश्वर्या आणि सलमानच्या रिलेशनशिपमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यावेळी सलमान चित्रपटाच्या सेटवर येऊन अडथळे निर्माण करायचा असे म्हटले जाते।

एकदा तर सलमानने ऐश्वर्याला मारहाणही केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शाहरुखने ‘चलते चलते’ या चित्रपटात ऐश्वर्या ऐवजी राणी मुखर्जीला घेण्याचा निर्णय घेतला होता। एवढंच नाही तर ‘चलते चलते’ आणि ज्या चित्रपटांमध्ये ऐश्वर्या आणि शाहरुख एकत्र काम करणार होते अशा ५ चित्रपटांमधून ऐश्वर्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता।

या पैकी एक चित्रपट हा ‘वीर जारा’ होता. या चित्रपटात ऐश्वर्याच्या जागी प्रीति झिंटाने काम केले। ऐश्वर्याने सिमी गरेवालच्या टॉक शोमध्ये हे कबूल केले होते की तिला शाहरुखच्या चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता। ऐश्वर्या म्हणाली, ‘”होय, एकेकाळी आम्ही दोघे एकत्र चित्रपट करणार अशी चर्चा होती।

पण नंतर अचानक असे काही झाले की मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.” हे कशामुळे घडले याविषयी मला माहित नाही. कोणाला याविषयी बोलायचे असेल तर ठीक आहे, परंतु मला त्यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. याचा अर्थ असा की त्यांना यावर चर्चाच करायची नव्हती. मी कुणाकडेही त्याची चौकशी करायला गेली नाही.”

दरम्यान, असे म्हटले जाते की २००९ मध्ये शाहरुखने करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये शाहरुखने ऐश्वर्याची माफी मागितली होती. ऐश्वर्याने शाहरुखला माफ देखील केले होते। आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *