सर्वाधिक मत मिळूनही सोनाली पाटील घराबाहेर कशी?

सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारा कार्यक्रम बिग बॉस मराठी 3 वर नेटकरी प्रचंड संतापले आहेत. या आठवड्यात झालेल्या अनपेक्षित एलिमिनेशनमुळे नेटकरी आपल्या संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. या आठवड्यात सोनाली पाटील घराबाहेर झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बिगबॉस स्क्रिप्टेड असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नेटकरी सोनालीला पाठिंबा देत आहेत. सोबतच #BisedBiggBoss, #WeStandWithSonali हे हॅशटॅगही ट्रेण्ड होत आहे. बिग बॉस मराठी 3 च्या ग्रॅण्ड फिनालेसाठी काही आठवडे उरले आहेत. अशात या सीजनचे टॉप 5 कोण ठरणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. मागच्या आठवड्यात सोनाली पाटील मीरा जगन्नाथ उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी पात्र होते.

त्यात सोनाली आणि विकास यांना जास्त मत मिळाल्याचं सोशल मीडिया ट्रेण्ड वरून निदर्शनास येत होतं. मात्र चांगली मतं मिळूनही सोनाली घराबाहेर झाली. त्यामुळे प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं. सोशल मीडियावर घेतल्या गेलेल्या पोलनुसार मीरा आणि उत्कर्ष यांना कमी वोट मिळाले होते. सोनालीच्या बाहेर जाण्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.

अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त म्हटलं मीरापेक्षा सोनालीला कमी मतं मिळाली यावर आमचा विश्वास बसत नाहीये. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलं, मीराला फक्त भांडण्यासाठी आणि टीआरपीसाठी बिग बॉसमध्ये ठेवलं आहे. अनेकांनी सोनालीला पाठिंबा दर्शवला आहे. सोनालीला फक्त एक मोहरा म्हणून दाखवण्यात आलं असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे।

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *