आमिर, सलमान आणि शाहरुख या खानपैकी सर्वात श्रीमंत कोण?

बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकार हे सर्वसामान्यांमध्ये फारच प्रसिद्ध असतात. त्यांच्या नावाप्रमाणे कोट्यावधींच्या संपत्तीसाठी त्यांना ओळखले जाते. बॉलिवूडमधील खान, कपूर हे परिवार चाहत्यांसाठी काही नवीन नाहीत. त्यांच्या अनेक पिढ्या या सिनेक्षेत्रातच कार्यरत आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये तीन खान हे फार प्रसिद्ध आहे. यात सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान या तिघांचा समावेश आहे.

या तिन्हीही खानांचा कोणताही चित्रपट सुपरहिट असतो. विशेष म्हणजे यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. पण या तिन्ही खानांमध्ये सर्वात श्रीमंत कोण? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. याचे उत्तर नुकतंच समोर आले आहे. बॉलिवूडचा ‘किंग खान’ अशा नावाने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान हा राजेशाही थाटात जीवन जगतो. शाहरुखची एकूण संपत्ती ६०० मिलियन डॉलर म्हणजे ४४ अब्ज ९९ कोटी ९७ लाख इतकी असल्याचे बोललं जाते.

वांद्रे इथल्या शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याचा समावेश जगातील टॉप १० बंगल्यामध्ये होतो. हा बंगला १९९५ मध्ये शाहरुखने १३ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आता या बंगल्याची किंमत आता जवळपास २०० कोटी रुपये इतकी आहे. अलिबागमध्येही शाहरुखचा फार्महाऊस आहे. दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे. तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. ही संपत्तीची किंमत साधारण ६६० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

शाहरुख खान हा बॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता आहे. त्याची स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनीदेखील आहे. ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या आयपीएलमधील संघाचा तो सहमालक आहे. शाहरुखचे ५५ टक्के शेअर्स त्यात असून त्याची किंमत सुमारे ५७५ कोटी रुपये इतकी आहे. शाहरुख जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो. बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून अभिनेता सलमान खानला ओळखले जाते. त्याचे जगभरात चाहते आहेत. सलमान खान हा सध्याचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमधील एक आहे.

सलमान खान हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. सलमानची संपत्ती २१० मिलियन डॉलर म्हणजेच १ हजार ४८० कोटी रुपयांच्या आसपास आहे. भारताव्यतिरिक्त परदेशातही सलमान खानचे घर आहे. नोएडा, दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी त्याच्या प्रॉपर्टी आहेत. सलमानच्या मुंबईतील राहत्या गॅलक्सी अपार्टमेंटची किंमत ११४ कोटींपेक्षा जास्त आहे. चित्रपटांव्यतिरिक्त सलमान जाहिराती आणि टीव्ही शोद्वारे वर्षाला जवळपास २५० ते ३०० कोटी रुपये कमवतो.

सलमानच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज, रोल्स रॉयस, वेंटले आणि ऑडी यासारख्या अनेक वाहनांचा समावेश आहे. यांची किंमत २८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आपल्या ३० वर्षाच्या सिनेकारकिर्दीत आमिरनं एकापेक्षा एक सरस चित्रपटात काम केलं आहे. तो निवडक चित्रपट करतो. मात्र त्याचे हे चित्रपट सुपरहिट असतात. मिळालेल्या माहितीनुसार, आमिरची एकूण संपत्ती १८० डॉलर्स म्हणजेच १ हजार २६० कोटी इतकी आहे.

आमिर खानचा पाचगणी या हिल स्टेशन परिसरात बंगला आहे. त्याची किंमत १५ कोटी आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात त्याची एकूण २२ घरे आहेत. हरदोई, यूपी येथे त्याचे वडिलोपार्जित घर, शेत आणि बाग आहे. ज्याची एकूण किंमत सुमारे 30 कोटी आहे. त्यासोबतच अमेरिकेच्या बेव्हरली हिल्समध्ये त्याचा बंगला असून त्याची किंमत ७५ कोटी आहे. विशेष म्हणजे त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. तो अनेक मोठ्या ब्रँडच्या जाहिराती करताना दिसतो। आमिरकडे BMW 7 सीरीज, रेंज रोव्हर, बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर, रोल्स रॉयस कूप आहेत. Mercedes Benz S600 Guard सारख्या आलिशान कार आहेत. या गाड्यांची एकूण किंमत 21 कोटींहून अधिक आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *