अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तुफान चर्चेत आहे. नुकतीच सुष्मिताची वेब सीरिज आर्या 2 रिलीज झाली ज्यासाठी तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पण सुष्मिता सेनसाठी वडिलांचे कौतुक सर्वात मोलाचे होते. सुष्मिता सेनच्या वडिलांनी खास कोलकाताहून फोन करून लोकीचं कौतुक केलं.
सुष्मिता सेन म्हणते की वडिलांकडून असे शब्द ऐकण्यासाठी तिला 27 वर्षे लागली. सुष्मिता सेन म्हणाली, “माझी आई आणि मी दोघांनी बसून वेब सीरिजचा दुसरा सीझन पाहिला. सीरिज पाहून माझे वडील अत्यंत भावूक झाले. त्यांनी मला कोलकाताहून फोन केला आणि सांगितले की त्यांना माझ्याबद्दल किती अभिमान आहे.
मी याची कल्पनाही करू शकत नाही. सुष्मिता पुढे म्हणाली माझ्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता. मी नेहमी माझ्या वडिलांना सांगायचे की एक दिवस त्यांना माझा अभिमान वाटेल. त्यांच्याकडून हे कौतुक ऐकायला मला 27 वर्षे लागली.
सुष्मिता सेनने 2020 मध्ये या सीरिजच्या पहिल्या सीझनद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. आर्य सीरिजला बेस्ट ड्रामा कॅटगरीमध्ये आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाल होतं.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद