कभी ख़ुशी कभी गम’ हा चित्रपट प्रत्येकानेच अनेकवेळा पाहिला असेल. यामध्ये शाहरुख आणि काजोलचा मुलगा तुम्हाला माहिती असेलच? आज तो कसा दिसतो आणि काय करतो? जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कभी ख़ुशी कभी गम’ या सदाबहार चित्रपटाला काल तब्बल २० वर्षे पूर्ण झाली.
हा चित्रपट आणि यातील व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात जशाच्या तश्या आहेत. या चित्रपटाने प्रत्येक कलाकाराला लोकप्रीतेच्या शिखरावर पोहोचवलं होतं. तसेच चित्रपटात काही बालकलाकारसुद्धा होते।
ज्यांना प्रचंड पसंत केलं गेलं होतं. या चित्रपटात शाहरुख आणि काजोलचा मुलगा कृश याने आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं होतं.ही भूमिका साकारली होती जिब्रान खान याने. आज २० वर्षानंतर हा छोटासा मुलगा एक हँडसम हंक बनला आहे.
आजही तो तितकाच चार्मिंग दिसतो. जिब्रान खान हा ज्येष्ठ अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा आहे. मात्र त्याने आजही आपलं करिअर बनवण्यासाठी आपल्या वडिलांच्या नावाचा वापर केला नाहीय. जिब्रान खान सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये असिस्टंट म्हणून काम करत आहे.
तसेच तो चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. त्यामुळे आगामी काळात त्यानं बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं तर आश्चर्य वाटू नये. जिब्रान खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तो सतत आपले चार्मिंग फोटो आणि व्हिडीओ शेअर करून लाखो तरुणींना वेड लावत असतो.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद