झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. प्रेक्षकांकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेतील सर्वच भूमिकांची सोशल मीडियावर चर्चा असते. यामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दीपूची भूमिका साकारत असून अभिनेता अजिंक्य राऊत इन्द्रा ही भूमिका साकारतोय. मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिका या तीन मुली आहेत.
लवकरच शलाका ही लग्न करून अमेरिकेला जाणार असल्याने देशपांडे कुटुंबात तिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. मालिकेत शलाका ही खूप साधी भोळी आणि हळवी आहे. ही भूमिका अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी साकारतेय. अभिनेत्री शर्वरी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांची मुलगी आहे. संपदा कुलकर्णी या मराठी चित्रपट, मालिका तसंच नाटकात एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात।
आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी ही देखील अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत आहे. मन उडू उडू झालं’ या मालिकेतील शलाका या भूमिकेसाठी शर्वरी हिने मेहनत घेतली असून तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडतेय. मालिका विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या यादीत आघाडीवर असणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत.
वादळवाट, अवघाचि हा संसार, होणार सून मी ह्या घरची, फुलपाखरू या त्यांनी दिग्दर्शिका केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद