बिग बॉस मराठी सध्या लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशात आता बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धकांचा हा प्रवास लवकरच संपणार आहे. त्यामुळे विजेता कोण ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असतानाच आता महेश मांजरेकर देखील आरोग्याच्या कारणामुळे बिगबॉस मध्ये पाहायला मिळणार नाहीत त्यांच्या जागी आता सिद्धार्थ जाधव महेश मांजरेकरांची भूमिका बजावताना पाहायला मिळणार आहेत
मागच्याच भागात स्वतः महेश मांजरेकरांनीच ह्याबाबत स्पष्टीकरण देखील दिल आहे. थोडेच भाग शिल्लक असताना अनेकांनी ते शो का सोडत आहेत असा प्रश्न देखील उपस्तित केला होता पण सध्या प्रकृती चांगली नसल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं समजत. बिगबॉसचे देखील आता थोडेच भाग शिल्लक आहेत. बिग बॉस नंतर आता कोणती मालिका कलर्स मराठीवर पाहता येणार याकडे देखील साऱ्यांचे लक्ष वेधले आहे
अशात ती मालिका नेमकी कोणती आहे या विषयी जाणून घेऊ कलर्स मराठीवर आजपर्यंत अनेक वेगवेगळे सामाजिक संदेश देणाऱ्या मालिका झाल्या आहेत. कलर्सच्या हिंदी चॅनलवर देखील हिंदी भाषेत अशा मालिका होत असतात. अशात बिग बॉस मराठीनंतर रोज रात्री 9.30 वाजता “तुझ्या रुपाच चांदणं” ही मालिका प्रदर्शित होणार आहे. यामध्ये समाजात असलेला काळ्या रंगाविषयीचा भेदभाव, तिरस्कार या गोष्टींवर प्रकाश टकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
ही मालिका एका हिंदी मालिकेवर रिमेक केली गेली आहे. हिंदीमध्ये लागी तुझसे लगण या मालिकेच्या कथेवर आधारित ही मालिका आहे. हिंदीमध्ये नाकुषा नावाचे मुख्य पात्र माही वीजने साकारले होते. मालिकेतील तिचा अभिनय वाखारण्या जोगा होता. नाकुशा हे पात्र साकारताना त्याला पूर्णतः न्याय देता यावा म्हणून तिने संपूर्ण अंगावर काळ्या रंगाचा मेकअप केला होता आता तुझ्या रुपच चांदणं या मालिकेमध्ये अभिनेत्री तन्वी शेवाळे मुख्य नक्षी हे पात्र साकारताना दिसणार आहे
तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या विषयीची पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. तिने मालिकेचा प्रोमो पोस्ट केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की मुलीच्या रुपाला कुणाची नजर लागू नये म्हणून काळा ठिपका लावला जातो पण नक्षीच्या बाबतीत असं काय घडलं की तिच्या आईने चक्क काळ्या रंगाने तिला रंगवलं? तन्वी अजब प्रेम की गजब कहाणी एबीसीडी या चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे लहानपणापासून तिला अभिनयाची आवड होती. तिने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे।
तसेच मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत ती पहिल्यांदाच दिसणार आहे तन्वी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते आपल्या चाहत्यांसाठी तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करते अशात आता तिने पोस्ट केलेला नवीन मालिकेचा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे आता माही वीज पेक्षा तन्वी हे पात्र अधिक चांगले साकारू शकेल का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात येत आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद