अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री कृती सेनॉन हिला मुंबईमध्ये आपला एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने दिला आहे. कृती सेनॉन हिने हे घर 2 वर्षांसाठी घेतले आहे. एका वेबसाईटने ही माहिती दिलीय की, इंडेक्सटॅप डॉट कॉमला मिळालेल्या रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटने ही माहिती मिळाली आहे. हे घर अंधेरी वेस्टमध्ये लोखंडवाला रोडवर अल्टेंटिस बिल्डिंगच्या 27 आणि 28 व्या मजल्यावर आहे.
त्याचे भाडे महिन्याला 10 लाख रुपये आहे. सेनॉनने 60 लाख रुपयांची डिपॉझिट दिली आहे. 12 नोव्हेंबर रोजी लिव्ह ॲण्ड लायसेंस ॲग्रीमेंट झालं . या कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आलंय की- 16 ऑक्टोबर, 2021 ते 15 ऑक्टोबर, 2023 पर्यंत 24 महिन्यांसाठी हे घर भाड्याने देण्यात आलंय. पण, अद्यापपर्यंत अमिताभ आणि कृती दोघांकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सेनॉनने 2014 मध्ये तेलुगु सायकोलॉजिकल थ्रिलर नेनोक्कादीन मधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. तिने बरेली की बर्फी, लुका चुप्पी, मिमी आणि हम दो हमारे दो यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. अभिनेत्री सनी लिओनने एका अपार्टमेंटच्या 12 व्या मजल्यावर रजिस्टर केलं होतं. तिने 28 मार्च, 2011 रोजी 16 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं.
तनु वेड्स मनु आणि झिरो सारखे चित्रपटांचे निर्माते आनंद एल राय यांनी एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलं होतं. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी आपले बंगले तगड्या किंमतील रेंटवर दिले आहेत. सलमान खाननेदेखील मध्यतंरी गॅलेक्सी अपार्टमेंटशिवाय बांद्रामध्ये एक डुप्लेक्स रेंटवर घेतलं. या डुप्लेक्ससाठी तो प्रत्येक महिन्याला 8.25 लाख रुपये मोजतो. त्याशिवाय सलमान खानने आणखी एक प्रॉपर्टी 11 लाख रुपयांच्या रेंटवर घेतली आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद