झी मराठी वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ती परत आलीय मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली होती.
पण आता मालिका बंद होणार असल्याचं समोर येत आहे. 18 डिसेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी 19 डिसेंबरपासून ‘देवमाणूस 2’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देवमाणूस-२ मालिकेचा काही दिवसांपूर्वी प्रोमो झी मराठी वाहिनीनं प्रदर्शित केला आहे.
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ‘देवमाणूस’मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. दुसऱ्या भागातही किरण गायकवाड मुख्य भूमिकेत असणार आहे.
बाबू, सरू आजी, टोण्या, डिम्पी, वंदी आत्या, नाम्या, बजा ही पात्रं नव्या मालिकेतही पाहायला मिळणार का हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे. कारण यातील कलाकारांची नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद