देवमाणूस 2 मध्ये हा अभिनेता साकारणार डॉ अजित कुमारची भूमिका

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतरही या मालिकेतील पात्र रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. या मालिकेची लोकप्रियता पाहता आता या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जेव्हापासून दुसऱ्या सीझनची घोषणा झाली तेव्हापासून या मालिकेबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. देवमाणूस 2 ची घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. दरम्यान या मालिकेत डॉ. अजित कुमारची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड दिसणार नसल्याच्या अनेक चर्चा ऐकायला मिळत होत्या.

सोशल मीडियावर देखील अनेकांनी किरण ही भूमिका आता करणार नसल्याचे सांगितले होते. पण या सर्व बातम्यांमध्ये अजिबात तथ्य नाही आहे. त्यामुळे डॉ. अजित कुमारची भूमिका अभिनेता किरण गायकवाडच साकारताना दिसणार आहे. तसेच या मालिकेतील बज्याची भूमिका साकारणारा अभिनेता किरण डांगे देखील दुसऱ्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.

अभिनेता किरण गायकवाडने 2017 साली लागीर झालं जी या भैयासाहेबची भूमिका केली होती.त्यानंतर 2020 मध्ये देवमाणूस मालिकेत किरणला अजितकुमार देवची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेत त्याने निगेटिव्ह भूमिका साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. आता प्रेक्षक या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *